Asia Climate Report: आशियातील देशांना २०२५ या वर्षात अत्यंत टोकाच्या हवामानाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काळात हवामान बदलांचे वाढते संकट गंभीर स्वरूप धारण करण्याची चिन्हे असून, त्यासाठी प्रभावी निरीक्षण व्यवस्था, पूर्वसूचना प्रणाली आणि परिणामाधारित हवामान अंदाज अत्यंत आवश्यक असल्याचा इशारा जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून दिला आहे..‘स्टेट ऑफ द क्लायमेट इन एशिया २०२५’ हा अहवाल ‘डब्ल्यूएमओ’ने प्रसिद्ध केला असून, यामध्ये हवामान बदलाचे संकट अधिक तीव्र होत असल्याचा इशारा दिला आहे. २०२५ मध्ये प्राणघातक उष्णतेच्या लाटा, विनाशकारी पूर आणि तीव्र दुष्काळामुळे लाखो लोकांच्या उपजीविकेवर परिणाम झाला असून, आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे अहवालात सांगितले आहे..‘डब्ल्यूएमओ’च्या महासचिव सेलेस्टे साउलो यांनी सांगितले, की आशियावर वाढते तापमान, समुद्राचे तापमान, समुद्रपातळीत वाढ आणि हिमनद्यांचे आकुंचन यांचा मोठा परिणाम होत आहे. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि हिमनदी तलाव फुटण्याच्या घटनांमुळे मानवी आणि आर्थिक नुकसान वाढत आहे, असा इशाराही त्यांनी दिला..Climate Change : आशिया देशांना २०२५ मध्ये हवामान संकटाचा मोठा फटका; उष्णतेच्या लाटा, पूर आणि दुष्काळामुळे वाढले नुकसान.या अहवालानुसार, १९९० नंतर आशियातील समुद्रांचे तापमान सातत्याने वाढत असून, २०२५ मध्ये त्याने उच्चांक गाठला आहे. सागरी उष्णतेच्या लाटांचा परिणाम चीन किंवा अमेरिकेच्या भूभागापेक्षाही मोठ्या असलेल्या जवळपास संपूर्ण समुद्र क्षेत्रावर झाला आहे. समुद्राचे तापमान वाढणे आणि समुद्राचे अम्लीकरण यामुळे सागरी परिसंस्था आणि किनारी भागातील लोकसंख्येसाठी धोका वाढत आहे. ‘डब्ल्यूएमओ’च्या निरीक्षणाखाली असलेल्या आशियातील एकूण २३ हिमनद्या २०२५ मध्ये आकुंचन पावल्या आहेत. सरासरीपेक्षा जास्त तापमान आणि हिवाळ्यात कमी हिमवृष्टी झाल्यामुळे हिमनद्यांतील बर्फ झपाट्याने वितळला. त्यामुळे भविष्यातील पाणी सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता आहे..डब्ल्यूएमओच्या अहवालानुसार, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून आशियामध्ये तापमानवाढीचा वेग सातत्याने वाढत आहे. १९९१ ते २०२५ या कालावधीत आशियातील तापमानवाढ जागतिक सरासरीपेक्षा अधिक वेगाने झाली आहे. २०२५ मध्ये आशियाचे सरासरी तापमान १९९१ ते २०२० च्या सरासरीपेक्षा जवळपास ०.९६ अंश सेल्सिअसने जास्त होते. त्यामुळे २०२५ हे आशियातील नोंदीनुसार दुसऱ्या ते चौथ्या सर्वाधिक उष्ण वर्षांच्या दरम्यान होते..Climate Crisis Looms Over India: किनारपट्टी भागात हवामान बदलाचा गंभीर परिणाम; आरोग्य आणि व्यवसायांना बसणार फटका, अझीम प्रेमजी विद्यापीठाचा अहवाल.आशियातील देशांना फटकाकझाकस्तानमध्ये मार्च, एप्रिल, जून आणि जुलै महिन्यांत तापमान सरासरीपेक्षा तब्बल १४ अंश सेल्सिअसने अधिक नोंदवले गेले. बहरीनमध्ये सलग दहा दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे राहिले. उष्ण, कोरडे आणि वादळी हवामानामुळे दक्षिण कोरियामध्ये इतिहासातील सर्वांत मोठ्या वणव्यांपैकी काही वणवे पेटले. जपान, चीन आणि दक्षिण कोरिया या देशांनी त्यांच्या इतिहासातील सर्वांत उष्ण उन्हाळ्याची नोंद केली. दुसरीकडे पाकिस्तान, श्रीलंका आणि व्हिएतनाममध्ये मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळांमुळे मोठे पूर आले. पश्चिम आशियातील इराणसह अनेक भागांत मात्र दुष्काळ, वाळू आणि धुळीच्या वादळांचा सामना करावा लागला..अहवालानुसार, पावसाच्या अतिरेकामुळे आणि कमतरतेमुळे दोन्ही प्रकारचे गंभीर परिणाम दिसून आले. पाकिस्तानमध्ये मॉन्सूनमुळे आलेल्या पुरात एक हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर ३० लाखांहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागले..समुद्रपातळीत वाढहिमनद्यांच्या वितळण्याचा परिणाम समुद्रपातळी वाढणे, हवामान बदलणे आणि हिमनदी तलाव फुटण्यासारख्या आपत्तींमध्ये होत आहे. तिबेट पठाराभोवतीचा ‘हाय माउंटन एशिया’ प्रदेश ध्रुवीय प्रदेशांनंतर जगातील सर्वाधिक बर्फसाठा असलेला भाग मानला जातो. मात्र, या भागातील बहुतांश हिमनद्या गेल्या काही दशकांपासून सातत्याने मागे सरकत आहेत. समुद्राची पातळीही विक्रमी वेगाने वाढत आहे. १९९९ ते २०२५ या कालावधीत उत्तर हिंदी महासागर किनारपट्टीवरील समुद्रपातळी वाढीचा वेग जागतिक सरासरीपेक्षा जास्त राहिला. भारतीय किनारपट्टीवर समुद्रपातळी वाढीचा वेग वर्षाला सुमारे ४.९ मिलिमीटर इतका नोंदवण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.