Flood Relief: अनुकंपा भरती, सेवाकर्मी पुरस्कार ही सर्व कामे सर्वांच्या प्रयत्नातून व एकजुटीने साध्य झाली. काम करत असताना पत्नीने दिलेली साथ मोलाची होती. आषाढी यात्रेत वारकऱ्यांची केलेली सेवा व पूरग्रस्तांसाठी केलेले काम कायम स्मरणात राहील, अशी भावना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केली..जंगम यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निरोप समारंभ व नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या हस्ते सीईओ जंगम व त्यांच्या पत्नी डॉ. तेजस्विनी जंगम यांचा सत्कार करण्यात आला. .Rail Project Development: दौंड-वाडी लोहमार्गाचे चौपदरीकरण.नूतन सीईओ कुशल जैन यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक चंद्रकांत जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भुजबळ उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, अमोल जाधव, .Ashadhi Wari : गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता.अभियंता संतोष कुलकर्णी, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, डॉ. एस. पी. माने, अविनाश गोडसे, गणेश हुच्चे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जवंजाळ, रणजित थिटे, संतोष निळ यांनी मनोगत व्यक्त केले..प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. शिक्षक संघटना, कास्ट्राईब कर्मचारी संघटना व जिल्हा परिषद पतसंस्थेच्या वतीने नूतन सीईओ जैन व जंगम यांचा सत्कार करण्यात आला..जंगम यांच्या बदलीमुळे वैयक्तिक नुकसान : पवारकुलदीप जंगम यांची बदली वेदनादायी आहे. त्यांच्या समवेत नुकतीच कामास सुरुवात केली होती. त्यांच्या बदलीमुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले, असे मत उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी व्यक्त केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.