Palghar News: आजचे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी हे उद्या भविष्यात शेतकरी आणि शेतीपूरक व्यावसायिक होणार आहेत. शेती आणि व्यवसाय करीत असताना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थीदशेतच अवगत व्हावे, शेती आणि व्यवसायात उत्तम पारंगत व्हावे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कृषितंत्र विद्यालय, आसनगावच्या प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. पाच एकर क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय खतांचा वापर करून विविध भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. सध्या उत्पादन सुरू झाले असून, नफा मिळत असल्याचे कृषी विद्यालयाकडून सांगण्यात आले आहे. .कृषितंत्र विद्यालय, आसनगावच्या विद्यार्थ्यांनी नवीन फळझाडे लागवड, वेलवर्गीय भाज्या, कोबीवर्गीय भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या इत्यादींसह शाश्वत उत्पादन देणाऱ्या पिकांचीही लागवड करण्यात आली आहे. .Vegetable Farming: रोहीपिंपळगाव शिवार झाले भाजीपाला पिकांचे हब.काकडी, खरबूज, कलिंगड लागवडीसह सूर्यफूल, फुलशेतीचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान देऊन आत्मसात करण्यासाठी कृषितंत्र विद्यालयाचे प्रा. प्रवीण भोये, प्रा. दिलीप पवार, प्रा. निशांत कासट यांची विशेष मेहनत आहे..Vegetable Farming: दोडका उत्पादनात गुणवत्ता, दर्जा राखण्यावर भर .उत्पादनास सुरुवातकाकडी, स्ट्रॉबेरी, मिरची, दुधी, शिराळे, वांगी, कोबी कलिंगड, खरबूज यांसह अनेक भाजीपाला पिकांचे उत्पन्न सुरू झाले आहे. वाणगाव, बोईसर अशा स्थानिक ठिकाणी हक्काची बाजारपेठ उपलब्ध असल्याने विक्रीही होत आहे. विद्यार्थी स्वतः विक्री व्यवस्थापनाचे अनुभव घेत आहेत..दुर्मिळ पिकांची लागवड विद्यालयाच्या प्रक्षेत्रावर झाली आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात शेती आणि पूरक व्यवसायात यशस्वी होण्यासाठी असे नावीन्यपूर्ण उपक्रम विद्यालयाच्या प्रक्षेत्रावर राबविण्यात येत आहेत. बदलत्या निसर्गाच्या चक्रामुळे शाश्वत उत्पादन साध्य होत नसल्याने शेतकऱ्यांनी परिस्थितीनुसार पीक पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञान वापरावे.- प्रवीण भोये, प्राध्यापक, कृषितंत्र विद्यालय, आसनगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.