Pune News: शेतीमालाच्या निर्यात व्यवसायात गुंतवणुकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने समर्थ क्रॉप केअर कंपनीच्या मालकास अटक केली आहे. या प्रकरणात आणखी आरोपी किंवा एजंट सहभागी आहेत का, याचा शोध आर्थिक गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे. .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी प्रशांत अनिल गवळी (रा. हडपसर) या संशयिताला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. हा प्रकार हडपसर येथील मगरपट्टा रस्ता परिसरातील समर्थ क्रॉप केअर कंपनीत घडला..Agri Export Scam: शेतमाल निर्यातीच्या नावाखाली १५ कोटींचा गंडा.शेतीमालाच्या निर्यात व्यवसायात गुंतवणूक केल्यास दहा टक्के नियमित परतावा किंवा २० महिन्यांत गुंतवणुकीवर दुप्पट रक्कम देण्याचे आमिष त्याने दाखवले. परंतु कोणत्याही गुंतवणूकदाराला अपेक्षित परतावा दिला नाही. पुणे, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांतील नागरिकांनी या कंपनीत गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे..MGNREGA Scam: दहेंद्रीतील ‘मग्रारोह’ घोटाळा उघडकीस.आतापर्यंत ३० हून अधिक गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. तक्रार असल्यास संबंधितांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी केले आहे..ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, सहायक आयुक्त शुभदा संखे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या पथकाने केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.