Yavatmal Drought : आर्णी, जि. यवतमाळ पावसाने दीर्घ ओढ दिल्याने आर्णी तालुक्यातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे. कपाशीची वाढ खुंटून फुले व बोंडांची गळती होत आहे, तर सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरण्यावर परिणाम झाला आहे. तुरीलाही पाण्याअभावी ताण बसला आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळी स्थितीच्या शासकीय सर्वेक्षणात कोणते निकष तपासले जाणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे..दुष्काळाचे मूल्यांकन केवळ पावसाच्या आकडेवारीवर होत नाही. पर्जन्यमानातील तूट, सलग कोरडा कालावधी, पिकांची पेरणी व प्रत्यक्ष अवस्था, जमिनीतील ओलावा, उपग्रहाधारित वनस्पती निर्देशांक, जलसाठे आणि भूजलस्थिती अशा विविध बाबींचे एकत्रित मूल्यांकन केले जाते. त्यानंतर प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी करून परिस्थितीची पडताळणी केली जाते. शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद अचूक आहे का, ई-पीक पाहणीमध्ये पीक नोंदविले आहे का आणि पंचनाम्यात प्रत्यक्ष पीकक्षेत्र व नुकसानीची स्थिती योग्यरीत्या नमूद झाली आहे का, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे..Parbhani DCC Bank: परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद कदम-बोर्डीकर.दुष्काळी सर्वेक्षणातील प्रमुख १४ निकषपर्जन्यमानातील तूट - प्रत्यक्ष पावसाची सरासरी पावसाशी तुलना.सलग पावसाचा खंड - साधारण तीन ते चार आठवड्यांचा कोरडा कालावधी.जून-जुलै पाऊस - सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची स्थिती.जून ते सप्टेंबर पर्जन्यमान - सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची स्थिती.पेरणी क्षेत्रातील घट - सामान्य क्षेत्राच्या तुलनेत झालेली पेरणी.वनस्पती निर्देशांक - उपग्रहाद्वारे पिकांचा हिरवेपणा व स्थिती.जमिनीतील ओलावा - पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध ओलाव्याचे मूल्यांकन.पिकांची प्रत्यक्ष अवस्था - वाढ, पानगळ, फुलोरा, शेंगा व बोंडांची स्थिती.पृष्ठभागावरील ओलावा - उपग्रहाधारित निर्देशांकातून आर्द्रतेची तपासणी.जलसाठ्यांची स्थिती - धरणे, तलाव व इतर पाणीसाठ्यांची उपलब्धता.भूजलस्थिती – विहिरी व भूजलाची उपलब्धता.नदी-नाले व जलप्रवाह - पाण्याच्या उपलब्धतेतील घट.प्रत्यक्ष क्षेत्रीय सत्यापन - शेतात जाऊन परिस्थितीची पडताळणी.पीकनुकसान व उत्पादनक्षमता - प्रत्यक्ष नुकसान आणि उत्पादनक्षमतेची पाहणी..Khamgaon Market Committee: खामगाव बाजार समितीतर्फे दुष्काळग्रस्तांना ११ लाखांचा निधी.ट्रिगर-१ नंतर ट्रिगर-२ महत्त्वाचादुष्काळ मूल्यांकनाच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानातील तूट आणि कोरडा कालावधीचा विचार करून ट्रिगर-१ निश्चित केला जातो. त्यानंतर पिकांची स्थिती, पीक क्षेत्र, रिमोट सेन्सिंग, जमिनीतील ओलावा आणि जलविषयक निर्देशांकांच्या आधारे ट्रिगर-२ बाबत मूल्यांकन केले जाते. पुढील टप्प्यात प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी महत्त्वाची ठरते..पंचनाम्यात शेतकऱ्यांनी काय पाहावे?पीकनुकसानीच्या पंचनाम्यात बाधित क्षेत्र, पिकाचे नाव आणि नुकसानीची स्थिती अचूक नोंदली आहे का, याची शेतकऱ्यांनी खात्री करावी. पंचनाम्याची माहिती तहसील स्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली जाते. मंजुरीनंतर पात्र लाभार्थ्यांची माहिती ऑनलाइन नोंदविली जाते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.