Cultural Heritage: संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी असलेल्या अरण (ता. माढा) येथील विकासासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. .अरणच्या १५० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांपैकी पहिल्या टप्प्यातील ८९ कोटी ७ लाख रुपयांच्या कामांना सोमवारी (ता. १६) प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. .Pilgrimage Development : राज्यातील तीर्थक्षेत्र विकासाचे ३०५ कोटींचे आराखडे मंजूर.शासनाने अरणला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा बहाल केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले होते. या आराखड्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री अतुल सावे, मंत्री छगन भुजबळ आणि आमदार योगेश टिळेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. .Village Safety Project: दानोळीत यात्रेच्या निधीतून ‘सुरक्षित गाव’ उपक्रम.या मान्यतेमुळे सावता महाराज भक्त परिवारात उत्साहाचे वातावरण आहे. प्रशासकीय मान्यतेनुसार, पहिल्या टप्प्यात सोई-सुविधा आणि सौंदर्यीकरणावर भर देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने इमारत बांधकाम (१६.९९ कोटी), .भव्य सभामंडप (३.०९ कोटी), संत सृष्टी म्युझियम (५.३२ कोटी), दर्शन मंडप (२.८० कोटी), मल्टिपर्पज हॉल, प्रशासकीय कार्यालय आणि भक्त निवास आदीचा समावेश आहे. तर मंदिर जीर्णोद्धार व सुशोभीकरणातून मुख्य मंदिराचे जीर्णोद्धार आणि सुशोभीकरणासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.