Nashik News: नाशिक जिल्ह्यातील मालसाणे (ता.चांदवड) येथील जैन धर्मीयांच्या णमोकार तीर्थ विकासासाठी ३६ कोटी ३५ लाख रकमेच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित बैठकीत मान्यता देण्यात आली. आराखड्यांतर्गत करण्यात येणारी कामे दर्जेदार असावी, यामध्ये कुठलीही तडजोड करण्यात येऊ नये. ही कामे विहित कालावधीत पूर्ण करावी. भाविकांना येथे आल्यानंतर अध्यात्मासोबतच तीर्थस्थळी येण्याचे समाधान मिळायला पाहिजे, अशा पद्धतीने कामे करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले..६ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कामांमध्ये स्थायी स्वरूपातील २४ कोटी २६ लाख आणि महोत्सवाच्या आयोजनाकरिता १२ कोटी ९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार राहुल आहेर उपस्थित होते..Rural Development: वक्तृत्वाला झाला ‘मनरेगा’ परिसाचा स्पर्श.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की णमोकार तीर्थ येथे येणाऱ्या भाविकाला कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. संबंधित यंत्रणांनी सर्व सुविधा येथे उपलब्ध करून द्याव्यात. देश-विदेशांतून येथे भाविक येणार आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी येण्याचे समाधान मिळेल, अशा पद्धतीने महोत्सवाचे आयोजन करावे. महोत्सव आयोजनासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. स्वच्छतेसाठी असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी. भविष्यात भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. येथील पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करून पाणी पुरवठा नियमित करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले..Dairy Development: तेलंगणात विजया डेअरीचा विस्तार: दूध खरेदी आणि विक्री नेटवर्क वाढवण्याचा मोठा निर्णय.या तीर्थाच्या विकासातून स्थानिक रोजगार निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने विकास आराखडा राबविण्यात यावा. हे ठिकाण जैन धर्मीयांचे राज्यातच नव्हे, तर देशात एक धार्मिक केंद्र म्हणून उदयास येईल.आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवासाठी देशभरातून १० ते १५ लाख भाविक येतील..हा सोहळा यशस्वी करण्याचे आवाहनही या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. बैठकीत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सादरीकरण केले.यावेळी अपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी गुप्ता,अपर मुख्य सचिव(सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकर,सचिव (नियोजन) शैला.ए, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम,जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे,णमोकार तीर्थचे पदाधिकारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.