Tadoba Andhari Corridor News : राज्यातील सर्वाधिक वन्यजीव घनतेच्या परिसरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या अतिसंवेदनशील वन्यजीव कॉरिडॉरमध्ये प्रस्तावित लोहखनिज खाण प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली. राज्य वन्यजीव मंडळातील तज्ज्ञ सदस्यांचा विरोध असूनही हा निर्णय घेण्यात आल्याने वाघांसह अन्य वन्यजीवांच्या संवर्धनावर दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे..ब्रह्मपुरीतील लोहाडोंगरी गावापासून सुमारे १५ किलोमीटरवर असलेला हा डोंगर काचेपार राखीव जंगल क्षेत्रात येतो. नागपूरस्थित एका पोलाद कंपनीला २०१९ मध्ये हा लोहखनिज ब्लॉक लिलाव प्रक्रियेत मिळाला होता. हा खाण प्रकल्प ब्रह्मपुरी वन विभागातील कक्ष क्रमांक ४३९ मध्ये प्रस्तावित असून यासाठी सुमारे ३६ हेक्टर समृद्ध वनजमिनीचे वळण अपेक्षित आहे. या परिसरातून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, ब्रह्मपुरी वन विभाग आणि घोडाझरी वन्यजीव अभयारण्य यांना जोडणारा वन्यजीव मार्ग जातो..Illegal Sand Mining: चांभारवाडीत वाळूमाफियांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’.येथे वाघ, बिबटे, अस्वल, रानडुक्कर, सांबर, चितळ यांसह अनेक वन्यप्रजातींचा वावर आहे. त्यामुळे हा भाग जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला आला होता. ब्रह्मपुरी परिसरात वाढणारा मानव–वन्यजीव संघर्ष लक्षात घेता, तसेच प्रकल्पाच्या संवेदनशीलतेमुळे अभ्यास समिती नेमून निर्णय पुढे ढकलण्यात आला..तीन सदस्यीय समितीने अहवाल दिल्यानंतर २४ जानेवारी २०२४ रोजी राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव आला. समितीने या प्रकल्पाला स्पष्ट नकार दिला. मात्र, नंतर प्राथमिक अहवालातील काही निरीक्षणांचा आधार घेत विषय पुन्हा चर्चेला आला. मंगळवारी (ता. ६) झालेल्या बैठकीत काही अटी व उपाययोजनांसह या खाण प्रकल्पाला मंजुरी मिळाली. राज्य वन्यजीव मंडळाने प्रस्ताव राष्ट्रीय मंडळाकडे पाठवला असून, त्यात वन्यजीव संरक्षणासाठी अटी व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविल्या आहेत..Soil Mining Scam: वाडा तालुक्यात चिंचघरमध्ये कोट्यवधींचा माती घोटाळा.घोडाझरी–अकारा अभयारण्याची घोषणायाच वन्यजीव कॉरिडॉरमध्ये सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रावर ‘घोडाझरी टू अकारा’ असे नवीन वन्यजीव अभयारण्य लवकरच घोषित केले जाणार असल्याची माहिती वन विभागाने दिली. वन्यजीव संवर्धनासाठी हे पाऊल महत्त्वाचे असले, तरी त्याच परिसरात खुल्या खाणीला परवानगी दिल्याने संवर्धन आणि विकास यातील विसंगतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत..बैठकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्हया निर्णयप्रक्रियेदरम्यान राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीची सूचना व विषयपत्रिका सदस्यांपर्यंत उशिरा पोहोचल्याचे समोर आले. काही सदस्यांना बैठकीच्या आदल्या दिवशीच माहिती देण्यात आली, तर विषयपत्रिका बैठकीच्या काही तास आधी वितरित झाली. बैठकीचे स्थळही अंतिम क्षणी बदलण्यात आल्याने अनेक सदस्य उपस्थित राहू शकले नाहीत..चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षी मानव वन्य प्राणी संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४७-४८ होती. यातील निम्मे मृत्यू हे ब्रह्मपुरी वन क्षेत्रातील आहेत. या वन विभागातच पुन्हा जंगल कमी करण्याचा सरकारचा डाव अनाकलनीय आहे. मानव वन्य प्राणी संघर्षात भर घालण्याचे काम सरकारकडून होत आहे. वन्य प्राणी आणि मोठ्या नरभक्षी वाघांच्या हालचालींसाठी महत्त्वपूर्ण असणारा हा कॉरिडॉर खनिज कामांमुळे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.संजय करकरे, वन्यजीव अभ्यासक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.