Kashmir Fruit Crisis: काश्मीरच्या फळ उत्पादकांचे मोठे नुकसान; जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद
Jammu Srinagar Highway: जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग गेल्या १७ दिवसांपासून बंद असल्याने काश्मीरच्या फळ उत्पादकांना सुमारे २०० ते २५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कापलेली सफरचंद व नाशपाती सडत चालली असून, पर्यायी मार्ग सुद्धा फळ वाहतुकीसाठी अपुरी ठरत आहे.