Fruit Crop Management: डाळिंब पिकावरील मावा ही एक महत्त्वाची कीड आहे. या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत छाटणीनंतर अधिक प्रमाणात दिसून येतो. सद्यःस्थितीत आंबिया बहराच्या नियोजनासाठी अनेक ठिकाणी छाटणी करण्यात आलेली असून कोवळी पालवी फुटलेली आहे.