रवींद्र पालकर, डॉ. अभयकुमार बागडे, शुभम पाटीलCrop Protection: गेल्या काही वर्षांत पेरू हे पीक शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे. या पिकावर आढळणाऱ्या फळमाशी, पिठ्या ढेकूण, चक्राकार पांढरी माशी, साल खाणारी अळी इ. किडी महत्त्वाच्या आहेत. मात्र मागील डिसेंबर महिन्यापासून पेरू पिकावर यापूर्वी क्वचितच दिसून आलेल्या मावा किडीचा तीव्र प्रादुर्भाव राज्यातील अनेक भागांत दिसून येत आहे. विविध ठिकाणच्या प्रक्षेत्र भेटी व निरीक्षणांमधून पेरू पिकावर मावा किडीच्या दोन वेगवेगळ्या प्रजाती आढळून येत आहेत. .त्यांची शास्त्रीय नावे ‘ग्रीनआयडिया सीडीआय’ (Greenidea psidii) व ॲफिस प्रजाती (Aphis sp.) अशी आहेत. यापैकी ग्रीनआयडिया सीडीआय ही मावा कीड अन्य सर्वसाधारण मावा प्रजातींपेक्षा काहीशी वेगळी आहे. या किडीची जगातील पहिली नोंद १९१६ मध्ये इंडो-मलेशियन किंवा आग्नेय आशियायी प्रदेशात पेरू पिकावर झाली होती. .भारतामध्ये ती पहिल्यांदा १९७८ या वर्षा पश्चिम बंगाल राज्यात झाल्याचे उपलब्ध माहितीवरून स्पष्ट होते. ही कीड प्रामुख्याने कोवळ्या शेंडे व नव्या पानांमधून रसशोषत असल्याने पिकाची वाढ खुंटते. शेंडे व पाने विकृत होतात. परिणामी, उत्पादनात लक्षणीय घट येते. आजच्या लेखात या आपल्या भागात नव्यानेच आढळणाऱ्या किडीची ओळख छायाचित्रांद्वारे पाहू..Guava Farming: पेरूतून मिळविले आर्थिक स्थैर्य.सामान्य नाव : केसाळ शेपूट असलेली पेरूवरील मावा कीड.इंग्रजी नाव : हेअरी टेल्ड ग्वावा अफीड. (Hairy-tailed guava aphid)शास्त्रीय नाव : ग्रीनआयडिया सीडीआय. (Greenidea psidii).किडीची ओळखपिलावस्था : किडीची पिलावस्था पिवळसर तपकिरी रंगाची असून, त्यांच्या पोटाच्या पृष्ठीय भागावर गडद तपकिरी ठिपके स्पष्टपणे दिसतात.पंखरहित प्रौढ : या किडीच्या पंखरहित प्रौढ अवस्थेतील देहयष्टी अग्रभाग निमुळता व उदर भाग फुगीर अशी वैशिष्ट्यपूर्ण असते. शरीराचा रंग चमकदार गडद तांबूस तपकिरी ते पिवळसर तपकिरी असतो. पोटाच्या पृष्ठीय बाजूच्या पुढील भागावर गडद तपकिरी रंगाची आडवी पट्टी स्पष्टपणे दिसते. नळीसारखे अवयव (सिफंक्युली) पिवळसर तपकिरी रंगाचे असून, मुळाशी व टोकाजवळ रंग अधिक गडद असतो. हे अवयव टोकाकडे बाहेरच्या बाजूला वळलेले असून, त्यावर अनियमित अंतरावर काट्यासारख्या सूक्ष्म रचना आढळतात. .Guava Processing: पेरूपासून मूल्यवर्धित उत्पादने.सिफंक्युलींवर जाळीसदृश रचना केवळ मुळाशीच दिसते; ती संपूर्ण लांबीवर आढळत नाही. डोके, शरीर व सिफंक्युलींवर लांब केस (सेटी) स्पष्टपणे दिसून येतात. शरीराच्या वरच्या बाजूवरील बहुतेक केस जाड असून, त्यांच्या टोकास फांदीसारखी किंवा बहुखंडी रचना आढळते, हेच या प्रजातीचे महत्त्वाचे व वैशिष्ट्यपूर्ण ओळख लक्षण आहे. अँटेना (शृंगिका) शरीराएवढे किंवा शरीरापेक्षा किंचित जास्त लांबीचे असतात. या किडीच्या पंखरहित प्रौढाची एकूण शरीर लांबी साधारणतः १.५ ते २.४ मि.मी. इतकी असते.पंखधारी प्रौढ : ही अवस्था तुलनेने अधिक निमुळत्या शरीराची असून, त्यांचे सिफंक्युली अधिक लांब व गडद रंगाचे, साधारणतः शरीराच्या लांबीच्या सुमारे तीन-चतुर्थांश इतके असतात..जीवनचक्रही कीड मुख्यतः अलैंगिक प्रजननाद्वारे पिलांना थेट जन्म देते. जन्मलेली पिले वाढीच्या प्रक्रियेत अनेक इन्स्टार पूर्ण करीत हळूहळू प्रौढ अवस्थेकडे वाटचाल करतात. या दरम्यान शरीररचनेत क्रमाक्रमाने बदल होत जातात,मात्र पूर्ण कायांतर होत नाही. त्यामुळे या किडीत अपूर्ण कायांतर (Incomplete Metamorphosis) आढळते.(टीप : उपलब्ध संदर्भ साहित्य व आजवरच्या संशोधन नोंदींचा अभ्यास करता, या किडीच्या जीवनचक्रावर आधारित सखोल व प्रजाती-विशिष्ट संशोधन झाल्याचे स्पष्टपणे आढळून येत नाही. त्यामुळे जीवनचक्राचा नेमका कालावधी निश्चित स्वरूपात मांडणे सध्या शक्य नाही.).नुकसानीचे स्वरूपया किडीची पिले व प्रौढ अवस्था कोवळ्या पानांवर तसेच शेंड्याकडील भागावर समूहाने रस शोषण करतात. या रस शोषणामुळे कोवळी पाने वाकडी-तिकडी होऊन गुंडाळली जातात. परिणामी झाड अशक्त बनते. त्याची नैसर्गिक वाढ खुंटते. याशिवाय ही कीड आपल्या विष्ठेद्वारे मधासारखा चिकट द्रव (हनीड्यू) स्रवते. या स्रावावर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. परिणामी झाडाची उत्पादनक्षमता कमी होऊन एकूण उत्पादनात लक्षणीय घट येते..व्यवस्थापननत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा.शेतात पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करून किडीचे नियमित सर्व्हेक्षण करावे.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निमयुक्त कीटनाशकाची फवारणी परिणामकारक ठरू शकते.रवींद्र पालकर ८८८८४०६५२२पीएच. डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.