APAR ID: निलंग्यात सात हजार ८३४ विद्यार्थी ‘अपार’ आयडीविना
One Nation One Student ID: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ अर्थात ‘अपार’ आयडी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने निलंगा तालुक्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू आहे.