Jalgaon News : एरंडोल तालुक्यात झालेल्या पावसाने पळासदड येथील अंजनी प्रकल्पासह भालगाव, खडकेसीम, पद्मालय, चोरटक्की येथील तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाले आहेत. त्यामुळे एरंडोल, धरणगावसह १४ गावांतील पाणीटंचाई दूर झाली आहे. .अंजनी प्रकल्पातील जलसाठा शंभरटक्के झाल्याने प्रकल्पातून सुमारे तीनशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व प्रकल्प पूर्णक्षमतेने भरल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे..Water Storage : लहानमोठ्या प्रकल्पांत ८२ टक्के पाणीसाठा.चारही लघुतलाव पूर्णक्षमतेने भरले. मात्र, पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अंजनी प्रकल्प शंभर टक्के भरल्याने त्यातून होणाऱ्या विसर्गामुळे अंजनीचे नदीपात्र प्रथमच खळाळून वाहत आहे. नदीत सर्वत्र जलपर्णी वाढल्याने पात्राचे पूर्णपणे विद्रुपीकरण झाले होते. पालिका प्रशासनासह पाटबंधारे विभागाने पात्राच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले होते. .Nashik Water Storage : नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ९४ टक्क्यांवर.मात्र, आठ दिवसांपासून अंजनी प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन विसर्ग सुरू असल्याने निसर्गानेच नदीपात्र स्वच्छ केल्याचे नागरिकांत उपरोधिकपणे बोलले जात आहे. अंजनी प्रकल्पातून शहरासह ग्रामीण भागातील सुमारे १४ गावांना पाणीपुरवठा होतो. .सध्यास्थितीत एरंडोल शहरात चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धरणगाव शहरात पाण्याची समस्या निर्माण झाल्यास प्रकल्पातूनच पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत असल्याने धरणगावची समस्याही काही प्रमाणात दूर झाली आहे..रब्बी पिकांना होणार फायदारब्बीसाठीही आवर्तन सोडण्यात येत असल्याने शेतकरी वर्गातदेखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अंजनी प्रकल्पासह पद्मालय, खडकेसीम, भालगाव व चोरटक्की येथील लघुतलावही ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाल्याने रब्बी पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार आहे..सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील नालेदेखील प्रभावीत झाले असून, खळाळून वाहत आहेत. अंजनी प्रकल्पातील जलसाठा शंभरटक्के झाल्याने आमदार पाटील यांच्या हस्ते नुकतेच जलपूजन करण्यात आले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.