Nahsik News : निफाड सहकारी साखर कारखाना विक्रीचा मुद्दा पुढे आल्यापासून शेतकरी सभासद, कामगार आक्रमक झाले आहेत. अशातच कारखान्याचे २५ ते ३० कोटी रुपयांचे भंगार विक्री झाल्याचे प्रकरण समोर आल्याने वातावरण तापले आहे. .या पार्श्वभूमीवर निसाका बचाव संघर्ष समिती व कामगारांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची भेट घेत कैफियत मांडली. या प्रकरणी लक्ष घालून निसाका लुटणाऱ्यांचा पर्दाफाश करणार, असा शब्द दमानिया यांनी शिष्टमंडळाला दिला..निर्भय महाराष्ट्र पक्षाच्यावर्धापनदिन कार्यक्रमानिमित्त दमानिया नाशिक दौऱ्यावर होत्या. या वेळी सभासद, कामगारांनी त्यांची भेट घेऊन कैफियत मांडली. दरम्यान, चर्चेत अनेक गंभीर बाबी त्यांच्यासमोर मांडल्या..Niphad Sugar Factory: ‘निसाका’ विक्रीला सभासद, कामगारांचा विरोध.सद्यःस्थितीत कारखान्याची झालेली दुरवस्था, बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनी व अष्टलक्ष्मी शुगर्स यांनी जिल्हा बँकेकडून २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर कारखाना घेऊन उद्याप सुरू केलेला नाही. त्यात जिल्हा बँकेकडून कारखाना विक्रीच्या हालचाली हे मुद्दे समोर आणले. .Nisaka Protest: ‘निसाका’ बचावसाठी सर्वपक्षीयांचा एल्गार .या संबंधित काही दस्तावेज व पुरावेदेखील शिष्टमंडळाने त्यांच्याकडे सादर केले. या वेळी निसाका बचाव संघर्च समितीचे धोंडिराम रायते, कामगार प्रतिनिधी प्रमोद गडाख आणि बी. जी. पाटील, गणेश आगळे उपस्थित होते..गैरव्यवहार येणार समोरदमानिया यांनी कारखान्यासंबंधी मुद्दे समजून शिष्टमंडळाकडून काही माहिती घेत महत्त्वाचे पुरावे व संबंधित दस्तऐवज यांच्या प्रती स्वतःजवळ ठेवून घेतल्या. तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिष्टमंडळाला मुंबईत बोलावले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.