Amravati News: पथ्रोट परिसरातील पायविहीर गावातील गोरक्षणमधील एका गाईची शिकार केल्याची घटना रविवारी (ता.१४) उघडकीस आली. १३ सप्टेंबर रोजी कुंभी वाघोलीपासून भुलेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर दिसलेला प्राणी व शिकार करणारा प्राणी, हा वाघ नसून बिबट असल्याचे वनविभागाने त पगमार्गावरून शिक्कामोर्तब केले. .कासमपूर येथील रहिवासी अरुण मोतीराम काळपांडे यांचे गोपाल कृष्ण गोरक्षण आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तीन महिने गोरक्षणमधील पशूंना इजा पोहोचू नये म्हणून ते अंजनगावसुर्जी येथील प्रसाद संगई यांच्या पायविहीर येथील शेतशिवारामध्ये ९७ पशूंचा कळप चरण्याकरिता ठेवतात..Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार.दिवस-रात्र त्यांची देखरेख करण्यासाठी तीन मजूर रखवालदार म्हणून त्याठिकाणी कार्यरत असतात. रविवारी (ता.१४) सकाळी सदरचे रखवालदार चहापाणी करण्यासाठी घरी आले होते. थोड्या वेळाने ते पुन्हा गोरक्षणमध्ये गेले, त्यावेळी त्यांना एक गाय दिसून आली नाही..तिचा शोध घेतला असता ती थोड्या अंतरावर मृतावस्थेत दिसून आली. पाहणी केली असता वन्यप्राण्याने १३ सप्टेंबरच्या रात्री शिकार केल्याचे दिसून आले, तर त्याठिकाणी पायाचे ठसेसुद्धा दिसून आले..Leopard Attack : महिन्याभरात १६ हल्ले; वनविभाग म्हणते घाबरू नका.याबाबतची माहिती रामलाल काळे यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनरक्षक अंकिता मुंडे यांनी त्याठिकाणी येऊन मृत गाईचा पंचनामा केला व पायाचे ठसे हे बिबट प्राण्याचे आहेत, याची खात्री केली. शनिवारला (ता. १३) वाघ आणि त्याच्या पिल्लाचे दर्शन झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले होते. त्यानंतर घडलेल्या घटनेने वन्यप्राण्यांच्या उपस्थितीच्या सदर विषयावर शिक्कामोर्तब झाले आहे. .आम्ही मागील सात ते आठ वर्षांपासून गोरक्षणमधील संपूर्ण पशूंचा कळप हा पायविहीर येथील प्रसाद संगई यांच्या शेतशिवारामध्ये पाठवितो. परंतु पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली. -अरुण काळपांडे, अध्यक्ष, गोपाल कृष्ण गोरक्षण, कासमपूर .मेळघाटच्या जंगल परिसरात वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे ते निदर्शनास येताच अशावेळी वनविभागाने आवश्यक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावावे. जेणेकरून त्यांची ओळख पटविण्यात मदत होईल. नागरिकांनीसुद्धा त्यांच्या वाट्याला न जाता तात्पुरते आपले काम बंद करून सुरक्षित ठिकाणी राहावे. -रामलाल काळे, संशोधक, रा. पायविहीर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.