ठळक मुद्देटोमॅटो आणि कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसानशेतमाल रस्त्याच्या कडेला आणि कचऱ्यात फेकून देण्याची वेळटोमॅटोचे दर किलो ५ ते ८ रुपयांपर्यंत खाली आलेकांदाही बाजारात मोठ्या प्रमाणात पडून.Tomato Onion Pricesकुर्नूल : आंध्र प्रदेशात टोमॅटो आणि कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. टोमॅटो आणि कांद्याचे भाव निचांकी पातळीवर घसरल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल रस्त्याच्या कडेला आणि कचऱ्यात फेकून द्यावा लागला..बाजारात दर पडल्याने शेतीत मोठी गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत..Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण.पठिकोंडा मार्केट यार्ड हे आंध्र प्रदेशातील सर्वात मोठे टोमॅटोचे मार्केट म्हणून ओळखले जाते. येथील घाऊक बाजारात टोमॅटोचे दर किलो ५ ते ८ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गेल्या आठवड्यात हा दर किलोमागे २० रुपये होता. बाजारात होणारी शेतमालाची आवक ऑगस्टच्या अखेरीस १० क्विंटलच्या तुलनेत गेल्या रविवारी ४० टनांपर्यंत पोहोचली. मोठ्या प्रमाणात आवक, पावसामुळे शेतमालाचा घसरलेला दर्जा आणि कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांकडून निर्यात मागणीत झालेली घट ही भाव घसरण्याची प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात आले आहेत..शेतकऱ्यांनी ६,५०० हेक्टर क्षेत्रावर प्रति एकर ३५ हजार ते ५० हजार रुपये खर्च करून टोमॅटो पीक लागवड केली होती. पण आता पीक लागवडीचा खर्च तर सोडाच शेतमाल तोट्यात विकावा लागत आहे. त्यांना शेतमाल रस्तावर फेकून देण्याची वेळ आली आहे..टोमॅटो पिकावर ट्रॅक्टर फिरवलाबेलगल मंडलातील रामंजनेयुलू या शेतकऱ्याने चार महिन्यांत दीड लाख रुपये खर्च केले. पण वाहतूक खर्च परवडत नसल्याने त्यांनी आपल्या टोमॅटो पिकावर ट्रॅक्टर फिरवला..Tomato Grafting : टोमॅटोत जिवाणू मर नियंत्रणासाठी ग्राफ्टिंगचा चांगला पर्याय.देवनकोंडा येथील आणखी एका शेतकऱ्याने शनिवारी त्याचा शेतमाल पथिकोंडा बाजाराजवळील कचरापेटीत फेकून दिला. “आम्हाला आज कष्टाने पिकवलेला शेतमाल सडलेला पाहावा लागत आहे.” अशा शब्दांत शेतकऱ्याने प्रतिक्रिया दिली..मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात पडूनकांदा उत्पादक शेतकऱ्यांचीही अशीच परिस्थिती झाली आहे. कुर्नूल कृषी बाजारात कांद्याचा घाऊक दर मागील महिन्याच्या प्रति क्विंटल २ हजार रुपयांच्या तुलनेत आता ३०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. बाजारात दररोज १ हजार क्विंटलहून अधिक कांद्याची आवक आणि निर्यातीसाठी मागणी नसल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा पडून आहे..राज्य सरकारच्या किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी योजनेअंतर्गत मार्कफेडने ३१ ऑगस्टपासून आतापर्यंत सुमारे २० हजार क्विंटल कांद्याची खरेदी केली. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. कुर्नूल बाजार समितीने शेतकऱ्यांनी कांद्याचे योग्य प्रकारे ग्रेडिंग करुनच तो विक्रीस आणावा आणि अपरिपक्व कांद्याची काढणी टाळण्याची विनंती केली आहे..१३ आणि १४ सप्टेंबर रोजी मार्केफेडकडून किमान आधारभूत किंमतीत खरेदी केलेल्या सुमारे १,५०० मेट्रिक टन कांद्याचा लिलाव करण्यात आला होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.