ठळक मुद्देकांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीरआंध्र प्रदेशातील नायडू सरकारचा मोठा निर्णयराज्यातील शेतकऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत.Onion Farmers : आंध्र प्रदेशात कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. याबाबतची माहिती राज्याचे कृषिमंत्री किंजारापू अच्चन्नायडू यांनी दिली..शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयात माध्यमांशी बोलताना, त्यांनी अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले..Water User Association : कानगावात कांदा उत्पादकांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू.यामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. राज्य सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्याचा उद्देश आहे. कुर्नूलमध्ये खरीप हंगामात ४५,२७८ एकरवर कांदी पीक लागवड झाली. याचा २४,२१८ शेतकऱ्यांना फायदा झाला, असे कृषिमंत्र्यांनी नमूद केले..कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याच्या निर्णयाचे राज्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. त्यांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले. मंत्री अचन्नायडू यांनी, शेतकऱ्यांना बाजारात योग्य भाव असताना त्यांचा शेतमाल विकण्याचा आणि चांगला भाव मिळेपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला..Onion-Garlic In Pitru Paksha : पितृपक्षात कांदा लसणाचे सेवन करावे का?.२०१६ मध्ये राज्य सरकारने ७,७२३ शेतकऱ्यांकडून २.७७ लाख क्विंटल कांद्याची खरेदी केली. याचे त्यांना ७ कोटी रुपये वितरीत करण्यात आले. त्याचबरोबर, २०१८ मध्ये ९,७४० शेतकऱ्यांकडून ३.४८ लाख क्विंटल कांदा खरेदी केला. ज्याचे ६.४५ कोटी रुपये देण्यात आले..राज्य सरकारकडून दखलआंध्र प्रदेशात गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर घसरले. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेला कांदा रस्त्याच्या कडेला आणि कचऱ्यात फेकून दिला. याची राज्य सरकारने दखल घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.