Yavatmal News : पुसद तालुक्यातील खर्षी गावातील शेतकऱ्याच्या जमिनीवरील एका प्राचीन झाडामुळे मोठा न्यायालयीन वाद उद्भवला आहे. ‘रक्तचंदन’ असल्याच्या दाव्यावर हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेले आणि रेल्वेला तब्बल एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागली. मात्र शास्त्रीय तपासणीत सव्वाशे वर्षांचे झाड बीजासाल प्रजातीचे निघाल्याने आता संपूर्ण प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे..वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड या महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पासाठी खर्षी येथील शेतकरी केशव शिंदे यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली. या बाबतची भरपाई मिळाली, परंतु शेतातील काही झाडे व भूमिगत पाइपलाइनच्या मोबदल्याचा प्रश्न प्रलंबित राहिला. शेतकऱ्याने या झाडांपैकी एका प्राचीन झाडाला ‘रक्तचंदन’ मानत त्याची किंमत तब्बल पाच कोटी रुपये असल्याचा दावा न्यायालयात केला..Tree Plantation : वाशीम जिल्ह्यामध्ये २.७९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट.सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या बाजू लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वेला या झाडासाठी एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले. रेल्वेने आदेश पाळून रक्कम न्यायालयात जमा केली. त्यातील ५० लाख रुपये शेतकऱ्याला काढण्याची परवानगी न्यायालयाने दिली. मात्र उर्वरित रक्कम झाडाच्या वैज्ञानिक मूल्यांकनानंतरच शेतकऱ्याला देण्याची अट ठेवण्यात आली..यानंतर पुसद वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. बी. एन. स्वामी यांनी बंगळुरू येथील नामांकित लाकूड विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेकडून झाडाचे शास्त्रीय मूल्यांकन करून घेतले. तपासणी अहवालातून संबंधित झाड ‘रक्तचंदन’ नसून ते बीजासाल प्रजातीचे आहे, असे स्पष्ट झाले. बाजार मूल्यानुसार या झाडाची किंमत अवघी अकरा हजार रुपये ठरते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\.Tree Plantation : सामाजिक दायित्व जाणत प्रत्येकाने वृक्षलागवड करावी.अहवाल न्यायालयात सादर झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ‘‘झाडाची किंमत अत्यल्प असल्याने एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई अनुचित आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दिलेली रक्कम व न्यायालयात जमा असलेली रक्कम व्याजासह परत मिळावी,’’ अशी मागणी करत अर्ज दाखल केला आहे. .रेल्वेच्या वतीने ॲड. नीरजा चौबे यांनी हा अर्ज सादर केला असून या प्रकरणावर न्यायालयीन सुनावणी होणार आहे. झाडाच्या पुनर्मूल्यांकनासाठी न्यायालयात सध्या ठरविण्यात आलेल्या किमतीवर आक्षेप नोंदविण्यात येईल, असे शेत मालक पंजाब शिंदे यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले. योग्य मोबदल्यासाठी परत न्यायालयीन संघर्ष लढणार असल्याचे ते म्हणाले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.