Agriculture Schemes: शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’ अंतर्गत ‘फार्मर आयडी’ नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात अद्याप सुमारे ९५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नसल्याने त्यांना आगामी हंगामात योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. .केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी सक्तीची करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण खातेदारांपैकी सुमारे ५,९६,१९५ पैकी ४,२९,६६९ शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली असून, उर्वरित शेतकरी अद्याप प्रक्रियेबाहेर आहेत. विशेषतः अमरावती व तिवसा तालुक्यांमध्ये नोंदणीचा वेग मंदावलेला असल्याचे सांगण्यात आले. .Farmer ID Registration : महाराष्ट्रातील ७७ लाख शेतकऱ्यांना देण्यात आला डिजिटल ओळख क्रमांक; उत्तर प्रदेश आघाडीवर.शहरी भागात नोंदणीला प्रतिसाद मिळत नसताना दुसरीकडे चिखलदरा व धारणीसारख्या दुर्गम भागांत नोंदणीचे प्रमाण १०० टक्क्यांच्या जवळ पोहोचले आहे. राज्यात ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेची अंमलबजावणी १५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू झाली असून सुरुवातीला नोंदणी ऐच्छिक होती. मात्र १५ एप्रिल २०२५ पासून ती बंधनकारक करण्यात आली आहे. .Farmer ID Registration: ‘फार्मर आयडी’ नोंदणीत पुणे तिसरे; साडेचार लाख शेतकऱ्यांना लाभ.नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्ज, खते, बियाणे तसेच विविध शासकीय अनुदान योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असे कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने हेल्पडेस्क सेवा सुरू केली असून, वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे..शेतकऱ्यांनी संभाव्य अडचणी टाळण्यासाठी २० मेपूर्वी ‘फार्मर आयडी’ नोंदणी पूर्ण करावी. तांत्रिक मदतीसाठी विभागीय यंत्रणा सज्ज आहे.- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.