Farmers Dialogue Programme: दुष्काळ आणि कर्जाच्या ओझ्याने खचलेल्या शेतकऱ्यांना संवादातून मानसिक आधार देण्याचा उपक्रम अमरावती विभागात राबविण्यात येत आहे. अडचणी समजून घेत शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी कृषी अधिकारी पुढाकार घेत असून विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. .अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे उत्पन्न घटण्याची शक्यता, वाढता आर्थिक ताण आणि कर्जफेडीची चिंता यामुळे अनेक शेतकरी मानसिक तणावातून जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या अडचणी केवळ ऐकून न घेता, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत संकटाचा सामना करण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न कृषी विभागाने सुरू केला आहे..Farmers Support: शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : मंत्री पंकजा मुंडे.या उपक्रमांतर्गत मोर्शी तालुक्यातील डोंगर यावली येथील रामचंद्र राणे यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या अडचणी जाणून घेत मोर्शीचे तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी त्यांना शासकीय व कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र आपल्या अडचणी समजून घेण्यासाठी अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचले, याचे समाधान व्यक्त करत राणे यांनी या संवादातून मोठा आधार मिळाल्याची भावना व्यक्त केली..Farmers Support: आंदोलन सुरू असले तरी शेतकऱ्यांना सेवा सुरूच; आकृतिबंध रद्दसाठी लढा सुरू; कृषी सेवा महासंघाची माहिती.अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथील रमेश भारसाकळे यांची परिस्थितीही अशीच चिंताजनक आहे. ठिबक सिंचनासाठी त्यांनी खासगी संस्थेकडून दोन ते तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, अवघ्या अडीच एकर शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. व्याजासह कर्जाची रक्कम तब्बल १६ लाख रुपयांवर पोहोचली. या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी घोरपडे यांनी तेल्हारा उपविभागीय कृषी अधिकारी तुषार ढगारे आणि तालुका कृषी अधिकारी शुभम बुरांडे यांना संबंधित शेतकऱ्याची भेट घेऊन मदतीचे मार्ग शोधण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी भारसाकळे यांच्याशी संवाद साधला. तसेच संबंधित पतपुरवठा संस्थेशी संपर्क साधून एकरकमी कर्जफेडीच्या तडजोडीबाबत (वन टाइम सेटलमेंट) चर्चा करण्यासह अन्य पर्यायांचीही चाचपणी सुरू केली आहे..आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदतीचा हातयवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील श्रीमती वासनिक यांच्या पतीने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. तीन वर्षांच्या चिमुकलीसह आयुष्याचा गाडा ओढणाऱ्या या महिलेने दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर आपली व्यथा मांडली. या परिस्थितीची दखल घेत कृषी विभागाने त्यांच्या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे..पारंपरिक पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त असल्याने अनेकदा पुरेसे उत्पन्न मिळत नाही. त्यातून आर्थिक अडचणी आणि नैराश्य वाढते. हे नैराश्य दूर करण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मानसिक आधार देणे, तसेच शासकीय योजनांच्या माध्यमातून मदतीचे पर्याय उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.- गणेश घोरपडे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.