Amaravati News : धन्य वितरणातील अनागोंदीची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी १६ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. एका दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला असून दोष आढळलेल्या ५२ दुकानदारांकडून तब्बल २० लाख १४ हजार इतका दंड वसूल करण्यात आला. राज्यातील ही मोठी कारवाई ठरली आहे..अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून दरमहा धान्य वितरित करण्यात येते. जिल्हा पुरवठा विभागामार्फत धान्य वितरणप्रणाली राबविण्यात येते. लाभार्थ्यांना नियमित व निर्धारित धान्य मिळते किंवा नाही, यावर या विभागाचे नियंत्रण असते..Ration Card e-KYC : दोन लाख ८७ हजारांवर लाभार्थी स्वस्त धान्यास मुकण्याची शक्यता.काही दुकानदारांमार्फत धान्य वितरित करताना गैरप्रकार करण्यात येत असल्याच्या तक्रारी येतात. त्याची तपासणी करण्यात येऊन श्रेणीनिहाय दोष निश्चित करून दंडात्मक व निलंबनासह परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येते. .अमरावती जिल्ह्यात १९१६ रास्त भाव दुकाने आहेत. या दुकानांच्या माध्यमातून अंत्योदय गटातील १ लाख २८ हजार २०७ कार्डधारक व ४ लाख ७८ हजार ५४८ लाभार्थ्यांना तर प्राधान्य गटातील ३ लाख ७४ हजार ३३५ कार्डधारक व १५ लाख १२ हजार १३० लाभार्थी आहे..Ration Card e-KYC : ई-केवायसीची प्रक्रिया संथ गतीने.जिल्ह्यातील एकूण दुकानांची संख्या १९६१नियमित तपासणी करण्यात आली १६६६आकस्मिक तपासणी संख्या ९२तक्रारीवरून तपासणी करण्यात आली १३दोषी आढळलेले दुकानदार ः किरकोळ ः३५, मध्यम ः १, गंभीर ः १६निलंबित परवाना १रद्द परवाने संख्या १६दंड आकारणी २०,१४,१६५ रुपये.लाभार्थ्यांना निर्धारित धान्य वितरित करताना मापात दांडी मारणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १६ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. धान्य वितरणावर जिल्हा पुरवठा कार्यालयाचे नियंत्रण असून लाभार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाते. \- निनाद लांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.