Monsoon Update: अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी मुळा नदीवरील आंबीत धरण रविवारी (ता. २८) पूर्ण भरले. .धरणातून १०० ते २०० क्यूसेक विसर्ग सुरू झाल्याने मुळा नदीला प्रवाह आला असून, त्याचा फायदा पुढील पिंपळगाव खांड धरणाच्या पाणीसाठ्यात होऊ लागला आहे. त्यामुळे मुळा खोऱ्यातील लाभधारक शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत..Water Conservation: दुर्गम कावळे गावात बंधाऱ्याचे लोकार्पण.अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात यंदा अद्याप जोरदार पाऊस झालेला नसला, तरी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हरिश्चंद्रगड परिसरातील पाणलोटातून आंबीत धरणात पाण्याची आवक वाढली. .Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन.१९३ दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण भरल्यानंतर त्यावरील सांडव्यातून १०० ते २०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग मुळा नदीपात्रात सुरू झाला आहे. आंबीत धरणातून सोडलेले पाणी आता ६०० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पिंपळगाव खांड धरणात दाखल होत असून, तेथील पाणीसाठा वाढू लागला आहे. .हरिश्चंद्रगड परिसरातील आंबीत, पाचनई, कुमशेत आणि पेठेवाडी भागात अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे घाटमाथ्यावरील ओढे-नालेही प्रवाही झाले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.