AgriStack Registration: आंबिया बहरासाठी फळपिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, डिजिटल कॉपी सर्व्हे बंधनकारक आहे. पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे. बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टलवर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील..आंबिया बहर फळपीक विमा योजनेमध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, पपई, अंजीर, नारळ व सुपारी या पिकांसाठी महसूल मंडळ हा घटक धरून ही योजना अधिसूचित जिल्हा, अधिसूचित तालुका आणि अधिसूचित महसूल मंडलात राबविण्यात येते. आंबिया बहर योजनेमध्ये नारळ, सुपारी पिकांचा या वर्षी प्रथमच सहभाग केला आहे. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रात नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. पिकास विहित केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) विमा संरक्षण प्रदान होईल..Crop Insurance Model: ‘पॅरामेट्रिक’ पीकविमा योजना राबवा.योजनेत भाग घेताना महत्त्वाच्या बाबीशेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक आहे.डिजिटल कॉपी सर्व्हे बंधनकारक आहे.पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करुन सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक,.आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२, ८(अ)उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुकवरीलबँक खात्याबाबत सविस्तर माहिती लागेल.कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील..महत्त्वाच्या बाबीविमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसुल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा विमा संरक्षित रकमेच्या साधारण ५ टक्के राहील. मात्र केंद्र शासनाने या योजनेअंतर्गत त्यांचा विमा हप्ता अनुदानासाठी ३० टक्क्यांपर्यंत विमा हप्ता दर मर्यादित केला आहे. त्यामुळे ३० टक्क्यांवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेअंतर्गत ३० ते ३५ टक्क्यांपर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले असून, ३५ टक्क्यांवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी ५० टक्के : ५० टक्के प्रमाणे भरावयाचा आहे..Fig Crop Insurance Scheme: अंजीर पिकासाठी विमा योजना.शेतकऱ्यांनी फळपीक लागवड केलेली नसताना किंवा उत्पादन योग्य फळपीक नसताना, दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा शासनाच्या जमिनीवर, अकृषक जमिनीवर विमा काढून विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांचे विरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा..शेतकऱ्यांनी फक्त स्वतःच्या जमिनीवर विमा घ्यावा.शेतकऱ्यांना डिजिटल क्रॉप सर्व्हे बंधनकारक आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होऊ शकतो.एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक अधिसूचित फळपिके असल्यास तो या सर्व पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो.या योजनेत प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरीता एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हे) आणि उर्वरित विभागाकरिता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हे.) अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी चार हेक्टर मर्यादेपर्यंत राहील..संत्रा, मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, अंजीर या फळपिकांसाठी मृग किंवा आंबिया या पैकी एक हंगाम निवडून योजनेमध्ये सहभागी होता येईल.विमा नुकसान भरपाई मिळणेसाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असावे.शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.inवेगाचा वारा आणि गारपीट या हवामान घटकपासून नुकसान झाल्यास त्याची सूचना घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस केंद्र शासन विमा ॲप किंवा १४४४७ वरून देणे आवश्यक आहे..शेतकऱ्यांनी उत्पादन योग्य फळपीक नसताना विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांना पुढील पाच वर्षे कृषी योजनांचा लाभ देण्यात येणार नाही. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.अधिक माहितीसाठी संपर्क ः शेतकऱ्यांनी १४४४७ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.(लेखक कृषी आयुक्तालयामध्ये कृषी संचालक (नियोजन व प्रक्रिया) आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.