Pune Onion Farming: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सध्या रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा लागवडीने चांगलाच वेग घेतला आहे. बाजारपेठेत कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याने या भागातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे..तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, लोणी, धामणी, वाळुंजनगर, लाखणगाव, जारकरवाडी, देवगाव, मेंगडेवाडी, काठापूर बुद्रुक आणि परिसरातील गावांमध्ये सध्या शेतशिवारात कांदा लागवडीची लगबग पाहायला मिळत आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांची कांद्याची रोपे लागवडीयोग्य झाली आहेत. त्यामुळे मजुरांची जुळवाजुळव करून कांदा लागवड उरकण्याची घाई सुरू आहे. यावर्षी कांद्याच्या क्षेत्रात मोठी वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात आहे..Late Kharif Onion Harvest: लेट खरीप कांदा पिकात काढणी सुरू.शेतात कांदा रोपांची लागवड करण्यासाठी शेतकरी कुटुंबांसह मजुरांची लगबग सुरू आहे. मात्र वाढलेले मजुरीचे दर, विजेची अनियमितता, पाण्याची उपलब्धता आणि कांदा रोपांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे..Onion Farming: रब्बी कांद्याची आंतरमशागत कधी करावी? तणांचा बंदोबस्त कसा कराल?.कांदा लागवडीसाठी एका महिलेला दिवसाला ६०० ते ७०० रुपये द्यावे लागतात. वाढत्या मजुरीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत असल्याचे अवसरी बुद्रुक येथील कांदा उत्पादक शेतकरी कल्याण हिंगे पाटील यांनी सांगितले. .सध्या शेतशिवारात कांदा लागवडीची धांदल उडाली असली, तरी वीज, पाणी, मजूर आणि रोपे यांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कांदा लागवडीचा हंगाम जोरात सुरू असला, तरी वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या माथी आर्थिक संकटाचे सावट कायम असल्याचे खडकवाडी येथील संतोष रामा सुक्रे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.