Kharif Sowing Challenges: अमरावती जिल्ह्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने यंदाच्या खरीप हंगामातील ५.८९ लाख हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांत झालेल्या किरकोळ पावसामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी वाढता उष्मा आणि पावसाचा दीर्घ खंड यामुळे संकट कायम आहे. त्यातच बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीची वेळ आलेल्या शेतकऱ्यांसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे..कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्याचे सरासरी पेरणी क्षेत्र सुमारे ६.८८ लाख हेक्टर असून, आतापर्यंत ५ लाख ८९ हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र ९९ हजार १३१ हेक्टर क्षेत्र अद्याप अपेरित आहे. पेरणी झालेल्या काही भागांत निकृष्ट बियाण्यांमुळे उगवण न झाल्याने दुबार पेरणीची गरज निर्माण झाली आहे..Kharif Season: नांदेडला साडेसहा लाख हेक्टरवरील पेरणी धोक्यात.१ जून ते २० जुलै या कालावधीत जिल्ह्यात ३२४.७ मिलिमीटर पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात २०६.२ मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजेच ११८.५ मिलिमीटर (३६.५ टक्के) तूट नोंदविण्यात आली. तर १ ते २० जुलै या कालावधीत अपेक्षित १७९ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ ६६.१ मिलिमीटर पाऊस झाला असून, या कालावधीत सुमारे ६३ टक्के तूट कायम आहे..Kharif Sowing 2026: जेमतेम पावसावरच खरीप पेरणी अंतिम टप्प्यात.गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २.६ मिलिमीटर पाऊस झाला. मोर्शी तालुक्यात सर्वाधिक १६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील १४ पैकी आठ तालुक्यांमध्ये अद्याप सरासरी पाऊस झालेला नाही, तर धारणी, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी आणि चांदूरबाजार या तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे..हवामान विभागाने ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पाऊस खंडित आणि विखुरलेल्या स्वरूपात राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे खरीप पिकांसमोरील संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.....असा आहे हंगामएकूण सरासरी पेरणी क्षेत्र : ६.८८ लाख हेक्टरपूर्ण झालेली पेरणी : ५.८९ लाख हेक्टरअपेरित क्षेत्र : ९९ हजार १३१ हेक्टर१ जून ते २० जुलै अपेक्षित पाऊस : ३२४.७ मिलिमीटरप्रत्यक्ष पाऊस : २०६.२ मिलिमीटरपावसाची तूट : ११८.५ मिलिमीटर (३६.५ टक्के)१ ते २० जुलै पावसाची तूट : सुमारे ६३ टक्केगेल्या २४ तासांतील सरासरी पाऊस : २.६ मिलिमीटरसर्वाधिक पाऊस : मोर्शी - १६.३ मिलिमीटर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.