Nanded News: हळदव (ता. लोहा) दिगंबर शेषेराव शिंदे यांच्या केदार काशिनाथ शिंदे (वय १४) आणि विशाल विनोद शिंदे (वय १३) या नातवांनी शालेय शिक्षणासोबत सेंद्रिय शेतीतही प्रावीण्य मिळविले आहे. शेतीमध्ये सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यापासून पिकांना देण्याच्या कामात हे दोघेजण आजोबांसह वडिलांना मदत करतात. शेतीला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती देतात. .हळदव गावशिवारात ९० टक्के लोक शेती, शेतीपूरक व्यवसाय करतात. दिंगबर शिंदे यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे. २०२३ मध्ये लोहा तालुक्यामधील ३६ गावांमध्ये ‘मग्रारोहयो’ आणि ॲक्सिस बँक फाउंडेशनच्या आर्थिक साह्याने अतिप्रभावी मेगा पाणलोट प्रकल्प चालू झाला..Agriculture Innovation: तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचणे आवश्यक : संजय किर्लोस्कर.याअंतर्गत २०२४ मध्ये रब्बी हंगामामध्ये भाजीपाला लागवड प्रात्यक्षिकासाठी दिगंबर शिंदे यांची निवड झाली. सेंद्रिय पद्धतीने निविष्ठा निर्मिती करून जमिनीचे आरोग्य सुधारणे हा प्रकल्पाचा उद्देश होता. प्रकल्पाच्या माध्यमातून शिंदे यांच्या शेतामध्ये शेतीशाळा सुरू झाल्या..शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना जिवामृत आणि दशपर्णी अर्क निर्मिती, कामगंध सापळे आणि पिवळे-निळे चिकट सापळ्यांचा उपयोग, गांडूळ खत निर्मिती आणि रासायनिक खते आणि कीडनाशकांची फवारणी याचा मातीच्या आरोग्यावर होणारा परिणाम आणि भविष्यातील संभाव्य धोका अशा विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले जात होते. शेतीशाळेमध्ये शिंदे यांचे नातू केदार आणि विशाल हे आपली शाळा पूर्ण करू सहभागी होत होते..Organic Farming: केंद्रीय पथकाकडून सेंद्रिय शेतीची पाहणी .तज्ज्ञांना ते शेतीतील वेगवेगळे प्रश्न विचारात होते. यामधून त्यांना सेंद्रिय शेतीची आवड निर्माण झाली. त्यांचा शेतीकडे कल वाढला. नातवांनी आजोबांच्या सोबत शेतामध्ये जिवामृत, दशपर्णी अर्क, पिवळे निळे चिकट सापळे लावणे, कामगंध सापळे लावणे आणि गांडूळ खत निर्मिती असे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांना पडणारे प्रश्न तज्ज्ञांना विचारत होते. यातून त्यांचा सेंद्रिय शेतीबाबत चांगला अभ्यास झाला..प्रकल्पाच्या माध्यमातून शिंदे यांना एक गांडूळ खत निर्मिती टाकी आणि दोन किलो गांडूळ कल्चर मिळाले होते. यातून त्यांनी गांडूळ खत निर्मितीला चालना दिली. तीन महिन्यांनी या टाकीतून सात क्विंटल गांडूळ खत आणि १० किलो गांडूळ कल्चर निर्मिती झाली. या गांडूळ खताचा उपयोग वांगी, भेंडी व टोमॅटो तसेच हळद पिकासाठी केला. यामुळे त्यांचा रासायनिक खतांचा खर्च कमी झाला..पीक व्यवस्थापनामध्ये शिंदे यांनी जिवामृत, अमृतपाणी, दशपर्णी अर्क, व्हर्मिवॉशचा वापर सुरू केला. सेंद्रिय खताच्या वापराने जमिनीची सुपीकता वाढवली. शिंदे यांच्या सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘बीआरएलएफ’ संस्थेचे सीईओ कुलदीप सिंग आणि वॉटर संस्थेचे विदर्भ विभागीय समन्वयक गणपत कबाडी यांनी भेट दिली..नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद कार्यालयात कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत केदार आणि विशाल यांना त्यांच्या सेंद्रिय शेतीमधील अनुभव सांगण्याची संधी मिळाली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतीच शिंदे यांच्या सेंद्रिय शेतीची पाहणी केली..दोन वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने दोन एकरांत हळदीचे उत्पादन घेत आहोत. येत्या काळात आम्ही हळद पावडर निर्मिती करणार आहोत.दिगंबर शिंदे, हळदव, ता. लोहा, जि. नांदेड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.