Chhatrapati Sambhajinagar News: हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटसह मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या बहुतांश मागण्या मान्य करत सरकारने त्याचा ‘जीआर’च काढला. सरकारच्या जीआरने ओबीसी आरक्षण संपुष्टात येणार असल्याचा आरोप ओबीसी नेते करत आहेत. .तर या जीआरचा काहीच उपयोग होणार नाही, अशी टीका काही जणांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा समाज बाधंवांना आवाहन केले. लोकांचे ऐकून गैरसमज करून घेऊ नका, सगळे मराठे ओबीसी आरक्षणात जाणारच, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला..Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सातारा गॅझेटवर सर्वांच्या नजरा; काय आहे सातारा गॅझेट?.मुंबईच्या आझाद मैदानात मराठा आरक्षणाची लढाई जिंकल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. जीआरवरून ओसीबी नेत्यांकडून होणाऱे आरोप आणि टीका या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील समाज बांधवांना आवाहन करताना म्हणाले, की या लढ्याला जे यश मिळाले ते सगळे यश माझ्या मराठा बांधवाचे आहे, मी मात्र नाममात्र आहे. आपल्या लढ्याला यश मिळाले आहे, आता यावरून गैरसमज, अफवा पसरवण्याचे प्रयत्न केले जाणारच..Maratha Reservation: ‘मराठा- कुणबी’करिता हैदराबाद गॅझेटियर लागू.पण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, त्यात तीळमात्रही शंका कोणी घेऊ नका. ज्यांच्या नोंदी नाहीत, म्हणून तर गॅझेटिअर लागू करायचे आहे. त्याचा जीआर निघणे खूप आवश्यक होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वांतत्र्यापासून हक्काचे गॅझेटियर असूनही सरकारने याबद्दल एक ओळही लिहिली नव्हती. आता समाजाने संयम ठेवावा, कोण्याही विदुषकाचे, अविचारी माणसांचे ऐकू नका, संयम, विश्वास ढळू देऊ नका. हैदराबाद गॅझेटच्या नोंदी लक्षात घेऊन मराठा समाज ओबीसीत जाणार आहे. अफवांकडे दुर्लक्ष करा, असे ते म्हणाले..माझ्यावरील विश्वास ढळू देऊ नका..गरीब मराठ्यांच्या मनात काही शंका असेल तर ती काढून टाका. मी तुमचे, समाजाचे वाटोळे कधीही होऊ देणार नाही. मला तुमच्यापासून तोडण्याचा, दरी निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. मी तुमच्यापासून दूर झालो की वाटोळ होईल, हा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका आणि माझ्यावर असलेला तुमचा विश्वास ढळू देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी या वेळी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.