Trade Unions Farmers Protest India: केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटना, केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी आणि लोकशाही विरोधी धोरणांच्या विरोधात एकवटल्या आहेत. त्यांनी १२ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय सर्वसाधारण संप पुकारला आहे. याबाबतच्या पूर्वतयारीसाठी त्रिची येथील उझावर संधाई येथे शुक्रवारी केंद्रीय कामगार संघटना आणि संयुक्त किसान मोर्चा (SKM) यांच्याकडून परिषद घेण्यात आली. .यावेळी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, हिंद मजदूर सभा, ऑल इंडिया सेंट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स, एसकेएम यासारख्या प्रमुख कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी एकमताने सहा ठराव मंजूर करण्यात आले..Farmer Protest: नाशिकमधून उद्या मुंबईकडे ‘लाँग मार्च’.यावेळी विविध संघटनांच्या नेत्यांनी चार कामगार कायदे मागे घेण्याची मागणी केली. यामुळे सुमारे ८० टक्के कामगारांना कायदेशीर संरक्षणाच्या कक्षेबाहेर ढकलण्यात आले आहे. या कायद्यांच्या माध्यमातून मोठ्या देशी आणि बहुराष्ट्रीय भांडवलदारांना लाभ मिळवून देण्याचा उद्देश आहे. तसेच उद्योगांना कोणत्याही नियंत्रणाशिवाय व्यवसाय करण्याची मुभा दिल्याचा आरोप त्यांनी केला..Farmers Protest: हक्कासाठीचा संघर्ष.नवीन बियाणे विधेयक शेतकऱ्यांसाठी हानिकारक असल्याचा दावा करत, त्यांनी केंद्र सरकारकडे सर्व शेतमालांसाठी किफायतशीर किमान आधारभूत किंमत (MSP) निश्चित करण्याची मागणी केली. वीज निर्मिती आणि वितरणाचे खासगीकरण करण्याचा उद्देश असलेले वीज (सुधारणा) विधेयक रद्द करण्याचीही मागणी संघटनांच्या नेत्यांनी केली. तसेच महात्मा गांधींचे नाव मनरेगा योजनेतून हटवण्याच्या निर्णयावर निषेध नोंदवण्यात आला. यासह केंद्राच्या निधीत झालेली कपात आणि आर्थिक भार राज्यांवर ढकलण्याच्या तरतुदीवर परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली..या परिषदेत विमा क्षेत्रात १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली. येत्या काही महिन्यांत अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, याचा इशारा देण्यासाठीच हा सर्वसाधारण संप असल्याचा इशारा कामगार संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.