Baramati News: पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर कोरेगाव पार्क आणि शिवाजीनगर येथील सरकारी जमिनी हडपण्याचे आरोप झाले आहेत. शिवाजीनगर येथील जमीन कृषी महाविद्यालयाच्या ताब्यात असून देशी गाईंवर संशोधनाचे काम तिथे चालते. ही जमीन महात्मा फुले यांनी ब्रिटिश सरकारला संशोधनासाठी दान दिली होती, अशी कागदपत्रे समोर आली आहेत. .यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रविवारी (ता. ९) पत्रकारांनी विचारले असता सरकारने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात सर्व तथ्ये समोर येतील, महिनाभरात वस्तुस्थिती समोर येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली..Uddhav Thackeray: पक्ष, मतं चोरलीत, आता जमीनही चोरायला लागलेत, उद्धव ठाकरेंची अजित पवारांवर जोरदार टीका.त्यांनी बारामती येथील सहयोग निवसस्थानी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी जमीन खरेदी गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ‘‘निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप होतात. मागे माझ्यावर ७० हजार कोटींचा आरोप झाला, त्याला १५-१६ वर्षे झाली. पण त्यातून काहीच पुढे आले नाही. बदनामी मात्र होते..बारामती येथील जमिनी खरेदीबद्दलही काही जणांनी आरोप केले. माझ्या नावाचा वापर करून जवळचे कार्यकर्ते किंवा नातेवाइकांनी काही सांगितले आणि ते नियमात बसत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी ते काम करता कामा नये,’’ असे श्री. पवार म्हणाले..Parth Pawar : पार्थ पवारांनी १८०० कोटींची जमीन ३०० कोटींमध्ये हडपली; अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप.‘‘मधल्या काळात काही घटना घडल्या, त्याची चौकशी सुरू आहे. एका महिन्यात वस्तुस्थिती समोर येईल. १ रुपयाचा व्यवहार न करता कसा कागद होऊ शकतो, हे आजपर्यंत माझ्या लक्षात आले नाही. ज्याने ही नोंदणी केली, त्याने कशामुळे केले हे एका महिन्यात कळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले अधिकारी चौकशी समितीत नेमले आहेत’’, असे श्री. पवार म्हणाले..दरम्यान, बारामतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जय पवार हे उमेदवार नसतील, ते निवडणूक लढविणार नाहीत, असा खुलासा करत या विषयावर त्यांनी पडदा पाडला. येत्या दोन-तीन दिवसांत राज्यस्तरीय निवडणुकीसंदर्भात जबाबदारीचे वाटप केले जाईल, असे ते म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.