Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व धरणे, प्रकल्प भरलेली आहेत. शिवाय दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण आहे. सध्या धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आता पाऊस वाढला तर नद्यांना पूर येण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तयारी केली आहे. .प्रवरा नदीला पूर आला तर शंभर गावांना तर मुळेला पूर आला तर २४ गावांना धोका पोहोचू शकतो. जिल्ह्यात २२३ गावे पूरप्रवण क्षेत्रात येत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातून सांगण्यात आले..Rain Crop Damage : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान.जिल्ह्यात प्रवरा आणि मुळा या दोन नद्यांचा उगम अकोले तालुक्यात आहे. अकोले तालुक्यात जास्त पाऊस झाल्यावर या दोन्ही नद्यांना पूर येतो. प्रवरा काठावरील १००, तर मुळा काठावरील २४ गावांमध्ये पूरपरिस्थितीचा परिणाम होत आहे. गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यात असला, तरी कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे, शेवगाव तालुक्यांतील ४० गावे पूरप्रवण होतात. .नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून विसर्ग सोडल्यानंतर पुराचा धोका निर्माण होतो. अकोले तालुक्यातील अतिवृष्टी हे पुराचे मुख्य कारण ठरत आहे. २००८ मध्ये ३८ हजार ९१३ क्युसेकचा उच्चांक आहे. मुळानदी काठावरील २४ गावे हे पूरप्रवण आहेत. .भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील असून श्रीगोंदे आणि कर्जत तालुक्यातील नदी काठावरील २० गावे पूरप्रवण आहेत. घोडनदीच्या काठावरील श्रीगोंदे तालुक्यातील ११ गावे पूरप्रवण आहेत. सीना नदी काठावरील २० गावे पूरप्रवण, तर खैरी ५ आणि म्हाळुंगी नदी काठावरील ३ गावांचा समावेश आहे..Crop Damage Survey : सोलापूर जिल्ह्यात ६० टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे इन्फ्लॅटेबल रबर बोटी-७, लाइफ जॅकेट ५००, लाइफ बोया १५०, सर्च लाइट १२, स्ट्रेचर १४, पोर्टेबल टेन्ट १२, फस्ट एड किट ६, अस्का लाइट १४, सेफ्टी हेल्मेट ३०, रॅपलिंग रोप ५० आदी साहित्य उपलब्ध आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भविल्यास मदतीसाठी पाचशे आपदा मित्र साधन सामग्रीसह प्रशिक्षणाने सज्ज आहेत..तालुका कृती आराखडाप्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनी आपत्ती व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार केलेला आहे. पूरप्रवण गावाजवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपग्रामीण रुग्णालयामध्ये आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. स्वस्त धान्याचाही पुरवठा अगोदर संबंधित गावांसाठी केला जात आहे. पूरप्रवण क्षेत्रातील गावे आणि परिसरातील पाचशे स्वयंसेवकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. लाइफ जॅकेट, सेफ्टी हेल्मेट, गमबूट, रेनसूट, रोप, एलइडी टॉर्च आदी साहित्य देण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.