Farmer Income: औषधी गुणधर्म असणारा अलिबागचा पांढरा कांदा बाजारात दाखल झाला आहे. या कांद्याला स्थानिकांसह पर्यटकांचीही पसंती मिळत आहे. पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन मिळाल्यानंतर झालेली प्रसिद्धी आणि कृषी विभागाने आखलेल्या विविध प्रोत्साहन योजनांमुळे पांढऱ्या कांद्याच्या बाजारपेठेला अलिबाग तालुक्यात पोषक वातावरण निर्माण झाले आहे..अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा चव, टिकाऊपणा, आणि दर्जासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. तालुक्यातील कार्ले, तळवली, खंडाळे, नेहुली या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते..White Onion Export : दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीची अधिसूचना जारी.भातकापणीनंतर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात. यंदा २५० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली असून या वर्षी पाऊस लांबल्याने पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले. त्यामुळे कांदा पीक चांगले आले आहे. यामुळेच उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत..White Onion : अलिबागचा कांदा पुण्याच्या बाजारपेठेत.२५० ते ३०० रुपयांपर्यंत भावयंदा सुमारे २५० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. सध्या ८० टक्के कांद्याची काढणी झाली असून हा कांदा बाजारात दाखल झाला आहे. या वर्षी पाऊस लांबल्याने पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले. त्यामुळे कांद्याचे पिकही चांगले आले असून उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत. कांद्याची मोठी माळ २५० ते ३०० रुपयेपर्यंत तर लहान माळ २०० रुपयेपर्यंत विकली जात आहे..या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे कांद्याचे पिकही चांगले आले आहे. पर्यटकसुद्धा माळा आवडीने घेतात. जीआय मानांकनामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मागणी वाढत- सुरेश पाटील, अलिबाग, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.