Akola News: अकोला स्थानिक जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीकडे आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीतील अनुभवानंतर येथे सत्तास्थापनेसाठी जोरदार स्पर्धा अपेक्षित असून कोणताही पक्ष सहज बहुमत मिळवणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे..सध्याच्या पक्षीय गणितानुसार, वंचित बहुजन आघाडी २५ सदस्यांसह जिल्हा परिषदेत सर्वाधिक संख्या असलेला पक्ष आहे. शिवसेना १२, भाजप ५, काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँग्रेस ४, अपक्ष २ आणि प्रहार संघटनेचा १ सदस्य आहे. गत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात जिल्हा परिषदेची सत्ता होती. यंदाची निवडणूक ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढे ढकलण्यात आली आहे..Local Body Results: सिंधुदुर्ग ‘झेडपी’, आठही पंचायत समित्यांमध्ये महायुतीचे वर्चस्व.जिल्हा परिषदेच्या भविष्यातील सत्तावाटपावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निर्णायक ठरणार आहे. येत्या सोमवारी (ता. २३) या विषयावर सुनावणी होणार असून, निकालानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग येण्याची शक्यता आहे. भाजपसारख्या पक्षाचे गत निवडणुकीत फक्त ५ सदस्य निवडून आले होते. परंतु महापालिकेत यश मिळाल्यामुळे आता संघटन मजबूत असून, छोटे घटक सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न होऊ शकतात..Local Body Results: कोल्हापूर ‘झेडपी’ महायुतीकडे.वंचित बहुजन आघाडी दमदार असून आपल्या सत्तेस टिकवण्यासाठी सावध भूमिका घेऊ शकते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. दोन गटांमध्ये विभाजित राष्ट्रवादी काँग्रेसचा दृष्टिकोनही महत्त्वाचा ठरणार आहे..एकंदरीत, अकोला जिल्हा परिषद निवडणूक हे राजकीय समीकरण, युती-आघाड्या आणि शेवटच्या क्षणी होणाऱ्या घडामोडींवर अवलंबून असून, निकालानंतर सर्व पक्षांसाठी सत्ता स्थापनेसाठी प्रचंड स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काळात अकोल्यातील राजकारण आणखी चुरशीचे आणि गतिमान राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.