Agriculture Department Seed Inspection: खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत राज्यभरातून तक्रारी येत असताना अमरावती विभागातील नमुना तपासणी अहवालाने या तक्रारींना बळ मिळाले आहे. अकोला जिल्ह्यात कृषी विभागाने तपासणीसाठी घेतलेल्या ४०२ सोयाबीन बियाण्यांच्या नमुन्यांपैकी तपासणी पूर्ण झालेले १४४ नमुने अपात्र (फेल) आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित बियाणे कंपन्यांवर कृषी विभाग काय कारवाई करणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे..खरीप हंगामापूर्वी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या बियाण्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकांकडून नियमित नमुने घेतले जातात. यंदा तीव्र उष्णतेचा विचार करून २५ मेनंतर नमुना संकलन मोहीम सुरू करण्यात आली होती..Poor Quality Soybean Seeds: निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे विदर्भातील शेतकरी संकटात.अमरावती विभागात विविध पिकांच्या एकूण ३,७८२ बियाणे नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २००५ नमुने सोयाबीनचे आहेत. या नमुन्यांमध्ये सर्वाधिक अपात्र नमुने अकोला जिल्ह्यात आढळल्याचे समोर आले आहे..यंदा अनेक भागांत सोयाबीनची उगवण कमी झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. परिणामी, अनेकांना दुबार पेरणी करावी लागली असून त्यांना आर्थिक फटका बसला आहे. अशा परिस्थितीत नमुना तपासणीचे निष्कर्ष महत्त्वाचे मानले जात आहेत..Fake Soybean Seeds: विदर्भात बोगस सोयाबीन बियाण्यांचा पर्दाफाश, ३०० नमुने फेल, परवाने रद्द ते फौजदारी कारवाई, मुख्यमंत्र्यांची माहिती.कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही कंपन्यांच्या बियाण्यांच्या नमुन्यांमध्ये उगवण क्षमता केवळ १२ ते १४ टक्क्यांपर्यंत आढळून आली आहे. प्रमाणित बियाण्यांसाठी आवश्यक असलेल्या किमान निकषांच्या तुलनेत ही उगवणक्षमता अत्यंत कमी असल्याने हा प्रकार गंभीर मानला जात आहे..कृषी विभागाच्या निकषांनुसार, उगवणक्षमता ५२.५० ते ६२.५० टक्क्यांदरम्यान असल्यास संबंधित प्रकरण ताकीदपात्र ठरते. तर ५२.५० टक्क्यांपेक्षा कमी उगवणक्षमता आढळल्यास संबंधित उत्पादक किंवा विक्रेत्याविरुद्ध न्यायालयीन कारवाईचा प्रस्ताव सादर केला जातो..दरम्यान, उर्वरित नमुन्यांची तपासणी अद्याप सुरू असून, अंतिम अहवालानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. निकृष्ट बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.