Akola News : अकोला जिल्ह्यातील २३ वाळू घाटांच्या ई-लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. पर्यावरण विभागाने यासंबंधी परवानगी दिली आहे. यापूर्वीच १५ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया राबवणे सुरू झाले असून आता त्यात आणखी उर्वरित वाळू घाटांची भर पडून ई-लिलाव प्रक्रिया राबवली जाईल. विशेष म्हणजे विकास कामांना वाळू मिळेल, असा दावा केला जात आहे. .वाळू घाटांचा लिलाव करण्यासाठी खनिकर्म विभागाने २३ घाटांचे सर्व्हेक्षण केले होते. या घाटांच्या लिलावासाठी आवश्यक असलेल्या परवानगीसाठी पर्यावरण विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे..नाशिक जिल्ह्यातील ४० वाळू घाट होणार बंद.दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महसूल मंत्र्यांच्या कार्यकाळात वाळू डेपोचे धोरण आखण्यात आले होत. राज्य शासनाने ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर वाळू डेपो तयार करून उत्खनन, वाहतूक, साठवणूक करून शासन मान्य किमतीत वाळूचे वाटप करणे, हा या धोरणाचा उद्देश होता. मात्र त्याला जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही..प्रारंभी तर जिल्ह्यात वाळू डेपो सुरू होऊ शकला नाही. वारंवार प्रक्रिया राबवल्यांनतर, वाळू डेपो सुरू झाले. जुने वाळू धोरण राबवण्यास अडचणी आल्यानंतर २०२५-२६ वर्षासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले. नवीन वाळू धोरणानुसार लिलाव प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे..State Sand Policy : राज्याचे वाळू धोरण आज जाहीर होणार.खनिकर्म विभागाने सप्टेंबरमध्येच वाळू घाटांचे सर्वेक्षण केले होते आणि पर्यावरण विभागासमोर घाटांच्या लिलावाचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावानुसार १५ वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यातच आता २३ वाळू घाटांच्या लिलावाला आता मंजुरी मिळाली. दरम्यान जिल्ह्यातील १५ वाळू घाटांच्या लिलावासाठी ई-निविदा ऑनलाइन स्वीकारण्याची मुदत दोन दिवसांपूर्वी संपली आहे. आता ई-निविदा (तांत्रिक लिफाफा) उघडणे, तत्पूर्वीची तांत्रिक पडताळणी आदी प्रक्रिया सुधारित वेळापत्रकानुसार करून गुरुवारी (ता. २०) ई-लिलाव प्रक्रिया राबवली जाईल..या घाटांना मिळाली परवानगीमूर्तिजापूर तालुका ः घुंगशी हसनापूर, सांगावा मेळ, वीरवाडा, लाखपुरी-२, खापरवाडा-१, खापरवाडा-२, दापुर-२, दुर्गवाडा, सागंवी, कोलसाला-१, कोलसारा-२, लोनसाना, पिंगला, बपोरी.बाळापूर तालुका ः स्वरूपखेड, हाता, मोखा, काजीखेड-२, हिंगणा शिकारी, जानोरी मेल, काजीखेड-१.तेल्हारा तालुका ः तळेगाव पातुर्डा, बाभुळगाव, वांगरगाव..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.