Akola News : आगामी रब्बी हंगामासाठी अकोला जिल्ह्यासाठी एकूण ४७ हजार ६५० टन खतसाठ्याला कृषी आयुक्तालयाची मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी यंदा ७२,१०० टन खतसाठ्याची मागणी केली होती. मात्र मागणीच्या तुलनेत थोडा कमी साठा मंजूर झाला आहे..मंजूर झालेल्या खत साठ्यात युरिया १५ हजार टन, डीएपी ८७५०, एमओपी ३४००, संयुक्त खते १५ हजार, तर एसएसपी ५५०० मेट्रीक टन इतका साठा समाविष्ट आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात मुख्यतः हरभरा या पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र असते, तर गहू, मका आणि ज्वारी ही पूरक पिके घेतली जातात. ही पीकपद्धती लक्षात घेऊनच खत वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून मिळाली..Fertilizer Linking: खतांच्या लिंकिंगबाबत तक्रार करा.यंदा जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात हरभरा व गव्हाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. पाण्याची उपलब्धता आणि अनुकूल हवामानामुळे शेतकऱ्यांचा कल रब्बीकडे वाढेल, असा अंदाज कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हंगामासाठी पुरेसा खतसाठा राहणार असून शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होऊन पेरणीस अडथळा येणार नाही, अशी अपेक्षा आहे..Compost Fertilizer: नासधूस झालेल्या पिकांपासून बनवा उत्तम कंपोस्ट; कमी खर्चात अधिक उत्पादन!.रासायनिक खत वापराचे प्रमाण घटलेगेल्या काही वर्षांत रब्बी हंगामातील रासायनिक खत वापराचे प्रमाण घटत चालल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. सन २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात एकूण ५१,९०८ टन खत वापरले गेले. .पुढील २०२३-२४ मध्ये हा वापर ३१,७८५ टनांवर घसरला. तर गेल्या २०२४-२५ हंगामात ३९,१५२ टन खत वापर नोंदवला गेला. या घटत्या प्रवाहाचा विचार करूनच आयुक्तालयाने यंदा ४७ हजार ६५० टन साठा मंजूर केल्याचे समजते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.