Akola News : यावर्षी सरकारने महाडीबीटी योजनेअंतर्गत राज्यात सुमारे ३२ लाखांवर तर अकोल्यात ६५ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची निवड केली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी रब्बी हंगामपर्यंत मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी अकोला जिल्ह्यातील आझाद फाउंडेशनने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. यंदाची सध्याची परिस्थिती पाहता ही मागणी करण्यात आली आहे..याबाबत आझाद फाउंडेशनतफे गोपाल पोहरे यांनी तातडीने पाठवलेल्या ईमेलद्वारे या निवेदनात म्हटले की, शासनाच्या महत्वाकांक्षी आणि शेतकरीहिताच्या यांत्रिकीकरण योजनेची सोडत काही दिवसांपूर्वी निघाली आहे. अकोला जिल्ह्यातील ६५ हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. .Farm Mechanization Scheme: यांत्रिकीकरणासाठी सोडत निघाली; शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली.मात्र, यावर्षी आधीच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही निसर्गाच्या लहरीपणामुळे बेताची आहे. सरकारने शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांप्रमाणे मदत तसेच रब्बी हंगामाची तयारी करण्यासाठी १० हजार रुपयांची रक्कम देण्याची घोषणा केली आहे. मात्र, यांत्रिकीकरणाची सोडत निघताना नापिकी आणि दुष्काळ या परिस्थितीचा विचार केला गेला नाही. .शेतकऱ्यांच्या हातात आजच्या घडीला पैसाच उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील रब्बी हंगामापर्यंत यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी वाढीव मुदत देण्याची गरज आहे. एकाच जिल्ह्यात ६५ हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांची यांत्रिकीकरणाच्या योजनांसाठी निवड झाल्याने अनेक विक्रेत्यांकडे गर्दी वाढली आहे. .कोटेशन घेण्यासाठी गर्दी होत आहे. परंतु पुढील रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या खिशात सुद्धा पैसा नाही. शिवाय इतक्या लाभार्थ्यांना देण्यासाठी यंत्रेसुद्धा एकाचवेळी मिळणार नाही. परिणामी विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना अधिक रकमेची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही म्हटले आहे..Farm Mechanization: यांत्रिकीकरणाची खीळ काढा.सातत्याने पाठपुरावालाभार्थ्यांची अर्ज संख्या सुमारे ६५ हजारांवर असल्याने प्रत्येक तालुक्यात गेले काही दिवस कृषी विभागाची यंत्रणा सातत्याने अर्जप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काम करीत आहे. जिल्हास्तरावरून हे काम वेगाने होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा घेतला जात आहे. शेतकऱ्यांनी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केल्यानंतर लवकरच पुढील प्रक्रिया होईल. .कृषी यंत्रे, अवजारांची खरेदी करता येईल. महाडीबीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मंजूर अनुदान दिले जाईल. जिल्ह्यात प्रामुख्याने अकोल्यात १० हजार, अकोट ७ हजार, बाळापूर ८ हजार, बार्शीटाकळी ७५००, मूर्तिजापूर ९३००, पातूर ६०००, तेल्हारा साडेसहा हजार असे कमी-अधिक प्रमाणात अर्ज दाखल झालेले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.