Farmer Assistance: अकोला जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बुधवारी (ता. ३०) येवता, येळवण आणि कानशिवणी परिसरातील शेतीची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावेत. तसेच शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळण्यासाठी पंचनामे सविस्तर व तपशीलवार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले..दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून प्रत्येक नुकसानीची काळजीपूर्वक नोंद घ्यावी. शेतकऱ्यांचे म्हणणे संवेदनशीलतेने जाणून घेऊन त्यांना अधिकाधिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी मीना यांनी सांगितले. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून शेतरस्ते, विहिरी यासह अधिकाधिक कामे राबवावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या..Crop Damage Relief : रायगडच्या शेतकऱ्यांना दिलासा; बांधावर जाऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश.जिल्हाधिकारी मीना यांनी येवता येथील शे. रशीद शे. इस्माईल आणि दीपक भोयर यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. येळवण येथे गुलाबराव ठाकरे यांच्या शेतातील सोयाबीन व तूर पिकाची पाहणी करण्यात आली. तसेच कानशिवणी येथे यशवंत खोब्रागडे यांच्या शेतातील कापूस आणि सुनीता मेश्राम यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली..Crop Compensation : पीक नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.येळवण येथे गजानन पंडागे, गोपाळराव वाघमारे आणि नंदकिशोर वाघमारे यांच्या शेतीला भेट देऊन भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, मनरेगा फळबाग लागवड, एचडीपीई पाईप व स्प्रिंकलर संच तसेच पोकराअंतर्गत सामूहिक शेततळे आदी कामांची पाहणी करण्यात आली. .कानशिवणी येथे ई-पीक पाहणीअंतर्गत प्रत्यक्ष शेतावर पिकांची पडताळणी करण्यात आली. या वेळी तहसीलदार कुणाल झाल्टे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुषार जाधव, कृषी उपसंचालक हरिश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी विवेक बऱ्हाटे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.