Akola News : जिल्ह्यात अनधिकृत कृषी कंपन्यांकडून होत असलेल्या अवैध व्यवसायाविरोधात परवानाधारक कृषी व्यावसायिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. याविरुद्ध कृषी व्यावसायिकांनी बुधवारी (ता. २०) दुपारपर्यंत बंद पाळला. याबाबत प्रशासनाला संघटनेने निवेदनही दिले आहे. .याबाबत कृषी व्यावसायिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की विविध कंपन्या अनधिकृत एजंट नेमून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. या एजंटकडे ना कृषी शिक्षण असते, ना डिप्लोमा-डिग्री राहते. त्यांना आमिषे दाखवून बियाणे, खते व औषधे अवैधरित्या विक्रीसाठी लावले जाते. अशा औषधांचा दर्जा निकृष्ट असून त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसतो..Illegal Fertilizer Sale : अप्रमाणित निविष्ठांच्या उच्चाटनासाठी अभियान राबवा.अधिकृत कृषी विक्रेत्यांविषयी गैरसमज निर्माण करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. या व्यवहारात कुठलेही अधिकृत बिल दिले जात नसल्याने जीएसटी व कर महसुलातही मोठा तोटा होत आहे..Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल.२०२३ मध्ये अमरावती विभागात एका कंपनीचा १.५ कोटींचा साठा जप्त करण्यात आला होता. अलिकडेच पातुर येथे जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारचा साठा जप्त करण्यात आला. .या अवैध कंपन्यांमुळे व्यवसायावर गंभीर परिणाम होत असून अनेकांना व्यवसाय बंद करण्याची वेळ येत आहे. शासनाला या कंपन्यांची माहिती असूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर कृषी व्यावसायिकांनी बुधवारी बंद पाळला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.