Rohit Pawar Raises Doubts Over Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की हा घातपात होता? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यावर आता आमदार रोहित पवार यांनीही, या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत घातपाताची शंका व्यक्त केली आहे. ''मलाही शंका आहे, हा घातपात असू शकतो?. ही घटना हलक्यात घेऊ नका. माझा काका गेलाय, आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,'' असा इशारा त्यांनी दिला. विमानाची तपासणी, अपघाताबद्दल प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे, सुरक्षेचा गंभीर प्रश्न आणि तांत्रिक गोष्टीबाबत गोळा केलेल्या माहितीचे त्यांनी आज पत्रकार परिषदेत सादरीकरण केले. .ज्या कंपनीचे हे विमान होते, त्या व्हीएसआर कंपनीची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या अपघाताच्या घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे २७ जानेवारी रोजीच्या वेळापत्रकानुसार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्याला येणार होते. ताफादेखील लागला होता, पण दादा का निघाले नाहीत? दादा एका मोठ्या नेत्याला भेटणार होते, त्या नेत्याला यायला का उशीर झाला? उशीर झाल्याने दुसऱ्या दिवशी विमानाने जाण्याचे ठरले का? प्लॅन का बदलला? असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. .व्हीव्हीआयपी झेड सुरक्षा असणाऱ्या दादांना घेऊन हे विमान चालले होते. बारामतीतून हे विमान पाटणाला जाणार होते. कंपनीकडून पायलटवर दबाब होता, अशीही माहिती त्यांनी निदर्शनास आणून दिली..Ajit Pawar: द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न सोडविणारा लोकनेता हरपला.विमानात यांत्रिक बिघाड झाला होता का?, टेक-ऑफ पूर्वी विमानाची तपासणी करण्यात आली होती का?, तपासणी करणारे कर्मचारी कोण?, विमानाचा टेकलॉग कुठे आहे?, विमान उड्डाणास योग्य असल्याचा अहवाल कुठे आहे?, दृष्यमानता कमी असताना विमान का उतरवले?, त्या विमानात अतिरिक्त इंधन टाक्या होत्या का?, दादा बसले होते त्याच्या मागच्या बाजूला इंधन टाक्या होत्या का? अशा अनेक शंका रोहित पवार यांनी उपस्थित केल्या आहेत..Ajit Pawar Tribute: ‘प्रशासनाचा वाघ म्हणजे अजितदादा’.घटना घडण्यापूर्वी विमान सूरतला जाऊन आले होते, असाही दावा त्यांनी केला. संबंधित विमान कंपनी मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. व्हीएसआर कंपनीवर अजून कारवाई का नाही? यावरही त्यांनी जोर दिला..'दादा घड्याळ नेहमी पंधरा मिनिटे पुढे ठेवायचे'सकाळी ८ वाजून ४३ ते ४५ मिनिटांनी ही घटना घडली. ९ वाजता दादा गंभीर जखमी आहेत. पण जिवंत आहेत, अशी बातमी मिळाली. ९.४५ वाजता दादांच्या निधनाची बातमी आली. डोकं सुन्न झाले. दादांचे ९ वाजता बंद झालेले घड्याळ सापडले. दादा घड्याळ नेहमी पंधरा मिनिटे पुढे ठेवायचे. ते आज आपल्यात नाहीत, पण विचाराने ते आपल्यासोबत आहेत, हे सांगत असताना रोहित पवार भावूक झाल्याचे दिसून आले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.