Ajit Pawar Death In plane Crash Baramati: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. २८ जानेवारी) बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या दुर्घटनाग्रस्त विमानात अजित पवार यांच्यासह ६ जण होते. अजितदादांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला. अजित पवार यांना ज्या रुग्णालयात नेले आहे, तेथे पोहोचल्यानंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले. .राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार दिल्लीहून बारामतीकडे रवाना झाले आहेत..अजित पवार आज बारामती येथील सभेसाठी आले होते. पण त्यांचे विमान विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले. त्यानंतर स्फोट होऊन विमानाला आग लागली. यात विमानातील सर्व ६ जणांचा मृत्यू झाला. .Ajit Pawar Passes Away: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन .अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अश्रू अनावर झाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाही रडू कोसळले. .Airoplane Crash News : अजित पवारांच्या अपघाती निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा शोकाकुल; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट.अजित पवारांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक, दुःखद: पंतप्रधान मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ''श्री अजित पवार तळागाळातील लोकांशी जोडलेले नेते होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात नेहमीच आघाडीवर असलेले एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना आदराचे स्थान होते. त्यांची प्रशासकीय कामांची समज आणि गरीब, वंचित लोकांना सक्षम करण्याची त्यांची तळमळही उल्लेखनीय अशी होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांचे कुटुंबीय आणि असंख्य कार्यकर्त्यांप्रति माझ्या संवेदना. ओम शांती.'' अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे..अजितदादांच्या निधनाने राज्याचे न भरून निघणारे नुकसान : एकनाथ शिंदे महाराष्ट्रासाठी आज काळा दिन असून खूप दुःखद घटना आहे. शिस्तीचा नेता आम्ही गमावला आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण राज्याचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. मोठी भाऊ हरपल्याची भावना आहे, अशी शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या विमान अपघाताची चौकशी होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.