Mumbai News: कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात हवा प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढत असून, येथील हवेचा दर्जा (एक्यूआय) ‘अस्वास्थ्यकर’ श्रेणीत पोहोचला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, श्वसनाचे आजार बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने तत्काळ प्रभावी उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता पर्यावरण जाणकारांकडून वर्तवली जात आहे..कल्याण-डोंबिवली शहराच्या वाढत्या शहरीकरणामुळे बांधकामे आणि वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दिवाळी सणानंतर हवेची पातळी खालावली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वाढत्या हवा प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची प्रभावी अंमलबजावणी पालिका प्रशासनाने केली पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे..Air Pollution: जनावरांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्याचे उपाय.हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक धोका आहे. शहरात घरातील जागेची कमतरता आणि स्वयंपाकघरातील राबता यामुळे हैराण असताना बाहेरदेखील हवेतील प्रदूषणाने श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे गृहिणी संगीता मोरे यांनी म्हटले आहे..‘ही’ घ्या काळजीहवेतील प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. तसेच बाहेर जाताना मास्कचा वापर करावा. जेणेकरून धुळीपासून होणारी ॲलर्जी टाळता येईल. सर्दी पडसे, त्वचा ॲलर्जी झाल्यास दुर्लक्ष न करता वेळीच औषधोपचार करणे गरजेचे आहे. लहान मुलांची काळजी घ्यावी. घरातील धूळ वेळीच्या वेळीस ओल्या कपड्याने स्वच्छ करावी, घरातील गॅलरीत परसदारात छोटेखानी झाडे लावावीत, जेणेकरून हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. सोनाली पाटील यांनी सांगितले आहे..Air Pollution : मोकळ्या श्वासासाठी ‘हवा’ सुधारा वसई-विरार महापालिकेला निर्देश .गुणवत्ता मोजण्यासाठी यंत्रणाकल्याण-डोंबिवली क्षेत्रात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेतील गुणवत्ता मोजण्यासाठी एअर क्वालिटी मॉनिटरिंग मशीन खडकपाडा ‘ब’ प्रभाग क्षेत्र कार्यालय आणि डोंबिवलीतील मानपाड्यातील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे बसविल्या आहेत. या मशीनद्वारे हवेची गुणवत्ता समजली जाते..हवेची स्थिती गंभीर :१ नोव्हेंबर : एक्यूआय - ४१ (चांगला)१० नोव्हेंबर : एक्यूआय - २१२ (अस्वास्थ्यकर)३० नोव्हेंबर : एक्यूआय - १४५४ डिसेंबर : एक्यूआय - १३६ (अस्वास्थ्यकर).प्रदूषणाची प्रमुख कारणे :वाढते शहरीकरणजुन्या इमारतींचे पुनर्बांधणीव पाडकामवाढती वाहनांची संख्यासुरू असलेली पायाभूत कामे.प्रशासनाकडून ‘मोजके’ उपायजनजागृती आणि कारवाई : पालिकेने पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित केले आहेत. तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारत कल्याणमधील एका आरएमसी प्लांटवर बंदी घातली आहे..धुळीवर नियंत्रण : घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आयोजनाखाली वाहन विभागाचे अधिकारी प्रवीण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य रस्त्यांवर धुळीचे शमन करण्यासाठी रात्रीच्या वेळेस चार पॉवर स्वीपर मशीन कार्यरत आहेत. मंडळाने काही उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी त्या अपुऱ्या असल्याचे मत व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.