Dharashiv News: रांजणीच्या (ता. कळंब) नॅचरल शुगर कारखान्याने एकाच दिवशी कार्यक्षेत्रातील ७५३ शेतकऱ्यांच्या शेतात कृत्रिम बुद्धिमता (एआय) ऊस उत्पादन वाढीच्या प्रकल्पांचा प्रारंभ केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या अशा प्रकल्पांना चालना देण्याचा प्रयत्न केला. यातूनच त्यांनी मंगळवारी (ता. सहा) प्रकल्पांचा अंमलबजावणीचा आढावा घेतला. यात जिल्ह्यातील तब्बल दीड हजार शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाची कास धरल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांचा आणखी सहभाग वाढावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. .राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून शेती व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्ते आधारित तंत्रज्ञानाच्या वापरासाठी धोरणात्मक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या धोरणांतर्गत जिल्ह्यात ऊस पिकाची उत्पादकता वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे..AI in Agriculture: पीक उत्पादकता वाढीसाठी पंजाबमध्ये 'एआय'चा वापर, काय आहे योजना?.जिल्ह्यात सुमारे ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड होत असून एआयच्या साहाय्याने ऊस शेती अधिक शाश्वत, नफेखोर व हवामान-संवेदनशील करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र तसेच मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या साह्याने ऊस उत्पादन वाढीसाठी एआयच्या वापराचे प्रायोगिक प्रकल्प जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत..या प्रयोगांतून उत्पादनात सुमारे ४० टक्के वाढ, पाणीवापरात ३० टक्क्यांपर्यंत बचत, उत्पादन खर्चात २५ ते ३० टक्के घट, पारंपरिक शेतीपेक्षा ५० ते ७० टक्के अधिक नफा होऊन कीड व रोगांचा आगाऊ इशारा मिळत असल्याचे सिद्ध आहे. हवामान केंद्रे व मातीतील सेन्सरमुळे शेतकऱ्यांना पिकाविषयी अचूक, वेळेवर व वैज्ञानिक माहिती उपलब्ध होत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी पुजार यांनी मंगळवारी घेतला..Ai in Agriculture: साताऱ्यातील दोन हजार शेतकरी होणार टेक्नोसॅव्ही.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) पांडुरंग साठे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक बैठकीला उपस्थित होते. .मागील बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांच्या माध्यमातून सुमारे दीड हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एआयचा लाभ घेतल्याचे दिसून आले. यासाठी प्रति हेक्टरी सुमारे पंचवीस हजार रुपये खर्च अपेक्षित असून पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात एक लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या खर्चामध्ये इन्सिट्यूटकडून नऊ हजार २५० रुपये व साखर कारखान्यांकडून सहा हजार ७५० रुपये मिळणार आहेत. यात शेतकऱ्यांचा वाटा नऊ हजार रुपये असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली..जिल्ह्यातील जास्तीत जास्त साखर कारखाने व सभासद शेतकऱ्यांनी या आधुनिक व भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा. तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब प्रमाण कमी होत असल्याने उसाची पाचट न जाळता ती शेतातच कुजवून सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पुजार यांनी या वेळी केली..‘जीडीपी’च्या वाढीत प्रकल्पाचा वाटाजिल्हाधिकारी पुजार यांनी जिल्ह्याच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) प्राथमिक क्षेत्राचा वाटा वाढवण्यासाठी एआय प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. यामुळे प्रत्येक साखर कारखान्याने किमान दहा क्लस्टर, अडीचशे शेतकरी व सुमारे वीस टक्के क्षेत्र एआय तंत्रज्ञानाखाली आणावे तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी कार्यशाळांचे आयोजन करून वीस जानेवारीपर्यंत ऊस उत्पादन वाढीच्या एआय प्रकल्पासाठी करारनामे करून ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडे सादर करावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पुजार यांनी दिले. .कारखान्यांनी शेतकरी व गाव निवडीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. प्रकल्पांत उसाचे क्षेत्र अधिक असलेली गावे, ठिबक सिंचनाचा वापर करणारे तसेच प्रगतशील शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. किमान २५ ते ४० शेतकऱ्यांचा एक क्लस्टर तयार करण्यात येणार असून, प्रारंभी माती नमुना तपासणी बंधनकारक राहणार आहे. समान प्रकारच्या जमिनीसाठी एक हवामान केंद्र व दोन माती सेन्सरसाठी सुरूवातीला शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये द्यावे लागतील. उर्वरित रक्कम साखर कारखाने व व्हीएसआयच्या माध्यमातून बारामती कृषी विज्ञान केंद्राला देण्यात येणार असल्याचे पुजार यांनी या वेळी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.