Pandharpur News : शेती क्षेत्रातील सर्व पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर फायदेशीर ठरतो आहे, शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. .पंढरपुरातील कडधान्य व तेलबिया पिके संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रामधील विविध विकास कामांचे उद्घाटन कुलगुरू डॉ. गडाख यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. श्री. गडाख म्हणाले, की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे वाऱ्याचा वेग, दिशा, पर्जन्यमान, वातावरणातील तापमान, पिकाच्या पानातील आद्रता, जमिनीतील ओलावा, मातीतील तापमान, इत्यादी अचूक नोंदी शेतकऱ्यांना मिळतात. .Agriculture AI : धाराशिवला एक लाख शेतकरी करणार ‘एआय’चा वापर.तसेच सदर तंत्रज्ञानामुळे पिकावरील कीड व रोग यांचा देखील अंदाज शेतकऱ्यांना येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव प्रमाणात वाढ होणार असून अनावश्यक खर्चात बचत होणार आहे, असे ते म्हणाले..या कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. नितीनकुमार रणशूर उपस्थित होते. .Ai in Agriculture: ‘एआय’च्या प्रसारासाठी समन्वय गरजेचा : कृषी आयुक्त मांढरे.यावेळी कडधान्य व तेलबिया पिके संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. रमेश भदाणे यांनी सध्या संशोधन केंद्रावर चालू संशोधन व बीज उत्पादन कार्यक्रमाबाबतची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. या कार्यक्रमासाठी रामचंद्र बनसोडे, लक्ष्मण नरोडे, समाधान गवळी, संतोष होटगीकर, विकास काळे, संतोष देशमुख, सोमनाथ वागज व कुमारी माधुरी पाटील यांनी परिश्रम घेतले..विविध विकासकामांचे उद्घाटनयाप्रसंगी कडधान्य व तेलबिया पिके संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र पंढरपूर येथील मुख्य प्रवेशद्वारावरील कमान, कार्यालयीन इमारतीचे दुरुस्ती व नूतनीकरण, केंद्रावरील विद्युत लाईन दुरुस्ती व हायमास्ट दिवे बसवणे, अवजार गृह दुरुस्ती व नूतनीकरण व विहीर गाळ काढणे व कठडा बांधकाम इत्यादी विकास कामाचे उद्घाटन डॉ. गडाख यांच्या हस्ते करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.