AI Weather Forecasting: पीक उत्पादन वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि बदलत्या हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांना अचूक निर्णय घेण्यास मदत व्हावी, या उद्देशाने लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, अंबाजोगाई येथील दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र व शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग अशा त्रिस्तरीय पद्धतीने राबविण्यात येत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कृषी प्रणालीचे लोकार्पण कृषी विज्ञान केंद्र येथे करण्यात आले..या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थानचे (बीड) प्रकल्प प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी होते. अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, विद्यापीठाचे प्रा. डॉ. ब्रिजेश अय्यर, तसेच ‘केव्हीके’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती..Ai in Agriculture: कृषी विज्ञान केंद्रात ‘एआय’ आधारित कृषी प्रणालीचा प्रारंभ.या वेळी एआय आधारित कृषी प्रणालीद्वारे उपलब्ध होणाऱ्या माहितीचे विश्लेषण आणि त्याचा शेतीतील उपयोग याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. हवामानाशी संबंधित विविध घटकांची माहिती शेतकऱ्यांना सुमारे तीन दिवस अगोदर उपलब्ध करून देण्याची सुविधा या प्रणालीमुळे मिळणार आहे. या पूर्वसूचनेचा उपयोग पेरणी, सिंचन, फवारणी, खत व्यवस्थापन आणि इतर कृषी कामांचे नियोजन करण्यासाठी होऊ शकतो. प्रणालीद्वारे उपलब्ध होणाऱ्या माहितीबाबत शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे तज्ज्ञांनी निरसन केले..Smart Farming: ‘स्मार्ट फार्मिंग’ हाच शाश्वत प्रगतीचा मार्ग.याप्रसंगी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, की आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता प्रत्यक्ष शेतीत वाढविणे आणि त्याचा शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी लाभ मिळवून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. नगराध्यक्ष मुंदडा म्हणाले, की एआय आधारित तंत्रज्ञानामुळे उपलब्ध माहितीच्या आधारे महागड्या निविष्ठांचा अधिक परिणामकारक व अचूक वापर करण्यास मदत होऊ शकते. डॉ. कुलकर्णी म्हणाले, की कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीतून उपलब्ध होणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून तिचा प्रत्यक्ष शेती व्यवस्थापनासाठी उपयोग केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी कष्ट कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा..कार्यक्रमास एआय आधारित कृषी प्रणालीमध्ये सहभागी असलेले विविध गावांतील शेतकरी तसेच कृषी क्षेत्रातील अधिकारी, तज्ज्ञ आणि प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद रेणापूरकर यांनी, तर आभार डॉ. प्रदीप सांगळे यांनी मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.