Solapur News: यंदाच्या प्रदर्शनात एआय आधारित स्वयंचित यंत्रणांचे स्टॉल लागले आहेत. पुढील वर्षीच्या प्रदर्शनात एआय आधारित लाईव्ह प्रोजेक्ट स्टॉल उभारण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली. .ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त होम मैदानावर आयोजित श्री सिद्धेश्वर कृषी या कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे गुरुवारी (ता. २५) महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. काडादी म्हणाले, पूर्वी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी पुण्यासह अन्य जिल्ह्यांत जावे लागत होते. शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, यासाठी सिद्धेश्वर देवस्थानने सोलापुरात कृषी प्रदर्शनाची सुरुवात केली. यात्रेसाठी देवस्थानला १५ डिसेंबरपासून मिळणारे मैदान आणि जानेवारीत यात्रेमुळे मर्यादित जागा यामुळे डिसेंबरमध्ये प्रदर्शन भरवण्याच्या निर्णयामुळे याला भव्य स्वरूप प्राप्त होऊ शकले. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेचे निवृत्त.Agro Processing Industry: महिला शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळणे आवश्यक .संचालक विजयकुमार बरबडे म्हणाले, यंदा प्रदर्शनासाठी जर्मन हँगर उभारले आहे. ३०० पेक्षा जास्त स्टॉल लागले आहेत. विशेषतः यंदा रोटरी क्लबच्या माध्यमातून पुष्प प्रदर्शनही भरवले आहे. प्रास्ताविकात कृषी प्रदर्शन समितीचे प्रमुख गुरुराज माळगे यांनी २५ ते २९ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या प्रदर्शनाची माहिती दिली..Konkan Agro Tourism: माझ्या कोकणचो रुबाब भारी!.याप्रसंगी यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सिद्धाराम चाकोते, सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे, तम्मा मसरे, आत्माचे प्रकल्प संचालक कांतप्पा खोत, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे यांची प्रमुख उपस्थिती होती..उत्पादन खर्च कमी करण्याची गरजप्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वी महापालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी तासभर संपूर्ण प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलची पाहणी केली. स्टॉलधारकांशी चर्चा करताना यांत्रिकीकरणातील आधुनिकीकरणही जाणून घेतले. ते म्हणाले, गेल्या १० - १५ वर्षांत शेतीमालाचे उत्पादन वाढले. मात्र, दरात वाढ झाली नाही. त्याउलट कृषी यंत्रे व निविष्ठांच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसह आता उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.