Fund Utilization Issues: राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडविण्यासाठी गाजावाजा करत आणलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरणाचा कृषी विभागाच्या नाकर्तेपणामुळे पहिल्याच वर्षी बोजवारा उडाला आहे. वित्त विभागाने या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी वितरित केलेला २० कोटी रुपयांचा निधी खर्च करता न आल्यामुळे सरलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी तो कृषी यांत्रिकीकरणाकडे वळविण्यात आला..तर ‘एआय फाॅर ॲग्री’ ही जंगी परिषद आणि इतर खर्चापोटी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष संपण्याच्या अखेरच्या दिवशी घाईघाईने चार विद्यापीठांना या निधीपैकी प्रत्येकी ५० लाख रुपयांचा, अर्थात दोन कोटी रुपयांचा निधी इनक्युबेशन केंद्रांसाठी वितरित करण्यात आला आहे..AI In Agriculture: शेतीच्या अचूक व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञान महत्त्वाचे : जाधव.‘एआय’साठी वितरित करण्यात आलेल्या निधीपैकी कृषी विद्यापीठांमध्ये पायाभूत सुविधा आणि पथदर्शी प्रकल्पांच्या उभारणीसाठी प्रत्येक विद्यापीठामागे पाच कोटी रुपये निधी खर्च करणे अपेक्षित होते. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ॲग्री टेक नावीन्यता केंद्रासंदर्भात कोणतेही स्पष्ट धोरण राबवले न गेल्यामुळे विद्यापीठांना देण्यात येणारा हा निधी वापरलाच गेला नाही..पाचशे कोटींची मंजुरीराज्यातील कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अजित पवार यांनी ५०० कोटी रुपये मंजूर केले होते. यासाठी प्रथम संस्थात्मक उभारणी अंतर्गत महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी स्वतंत्र केंद्र स्थापन करण्यात येणार होते. .कृषी विभागाच्या प्रधान सचिवांच्या अधिपत्याखालील या यंत्रणेने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर भागीदारी, नवप्रकल्पांना प्रोत्साहन, प्रकल्पांची निवड, अंमलबजावणी व अर्थसहाय्य, समन्वय आणि क्षमता बांधणी इत्यादी बाबींवर काम करणे अपेक्षित होते. या केंद्राच्या नेतृत्वासाठी व्यवस्थापकीय संचालकाची नियुक्ती करण्यात येणार होती. मात्र गेल्या वर्षभरात या केंद्रासाठी व्यवस्थापकीय संचालक नेमण्यात आलेले नाहीत..एआय केंद्राची कूर्मगतीमुलाखतीद्वारे निवड केलेल्या व्यवस्थापकीय संचालकांनी अवास्तव मागण्या केल्याचे म्हणणे प्रशासनाचे आहे. मात्र प्रतीक्षा यादीतील उमेदवारांबाबत काय निर्णय घेतला याबाबत मात्र प्रशासनाकडून कोणतीच माहिती देण्यात येत नाही. परिणामी, हे केंद्र कूर्मगतीने कार्यरत आहे..वर्ष हालचालींविनाया धोरणांतर्गत पहिल्या टप्प्यात कृषी विद्यापीठांमध्ये आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई), आयआयएमएस्सी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस, चेन्नई)सारख्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली चारही कृषी विद्यापीठांमध्ये कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता नावीन्यता आणि इनक्युबेशन केंद्रांची स्थापना करण्यात येणार होती. मात्र त्याबाबतही कोणतीही हालचाल वर्षभर झाली नाही. पण मंजूर निधी परत जाऊ नये, यासाठी अखेरच्या दिवशी निधी दिला गेला..AI In Agriculture: ‘एआय’ अंमलबजावणीचा कार्यभार उपसचिवांकडे.कृषी विद्यापीठांसाठी वितरित करण्यात आलेल्या २० कोटींपैकी प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्चाची तरतूद होती. या ५ कोटींमधील ५० लाख रुपये बांधकाम आणि साडेचार लाख रुपये सॉफ्टवेअर निर्मिती, प्रशिक्षण, कर्मचारी नियुक्ती, त्यांचे मानधन आणि पायाभूत सुविधांसाठी खर्च करणे अपेक्षित होते. मात्र यातील कोणतीच गोष्ट विद्यापीठांना करता आली नाही..सत्ताधारी आमदारांचीही टीकाया परिषदेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. या परिषदेच्या आयोजनावरून विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रशासनावर टीका केली होती..प्रशासनाला केवळ कार्यक्रमात रससूत्रांच्या म्हणण्यानुसार, या धोरणांतर्गत जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे हे शिखर संमेलन घेण्यात नावीन्यता केंद्राला आणि कृषी विभागाला जास्त रस होता. त्यानुसार मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर या आलिशान ठिकाणी ही परिषद झाली..‘एआय’साठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे निधी मंजूर झाला. तो निधी मार्च महिन्यात वितरित झाला. त्यामुळे खर्च करण्यात अडचण आली. कोणतीही गोष्ट नवीन सुरू करतो, तेव्हा संस्थात्मक उभारणी, कर्मचारी नियुक्ती, आनुषंगिक आदेश आदी गोष्टी कराव्या लागतात. त्यात कालापव्यय होतो. ५०० कोटी रुपयांचा हा निधी पाच वर्षांसाठी देण्यात आला आहे. त्यामुळे हे धोरण नीटपणे राबविले जाईल.- श्रीकांत आंडगे, उपसचिव तथा सीईओ, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नावीन्यता केंद्र.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.