Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या नगरपालिकेच्या मतदानानंतर मतमोजणीला अजून १७ दिवस बाकी आहेत. त्यामुळे मतपेट्या सांभाळण्यासाठी प्रशासनाकडून कडक सुरक्षा करण्यात आली आहे. सर्व ईव्हीएम मतदान यंत्रांवर तालुक्याच्या ठिकाणी द्विस्तरीय सुरक्षाव्यवस्थेसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा २४ तास वॉच आहे. आठ राजपत्रित अधिकाऱ्यांवर सुरक्षा पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी दिली असून प्रमुख अधिकाऱ्यांचेही यावर लक्ष असेल. मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी बाहेर कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. .अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदे या आठ नगरपालिकांसाठी मंगळवारी (ता. २) मतदान झाले. न्यायालयात याचिका दाखल असलेल्या तीन नगरपालिका व एका नगरपंचायतीचे मतदान रद्द होऊन ते २० डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे ह्या सर्व नगरपालिकांची एकत्रित मतमोजणी २१ डिसेंबरला होईल..Election Controversy: व्हायरल व्हिडिओनंतर तहसीलदारांचे चौकशीसाठी पोलिसांना पत्र.ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून न्यायालयात प्रविष्ट असलेल्या याचिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. काही नगरपालिकांच्या निवडणुका आठ वर्षांपासून रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिला..त्यानंतर आयोगाने पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. जिल्ह्यातील ११ नगरपालिका आणि नेवासे नगरपंचायत अशा १२ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या. न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे तीन नगरपालिका आणि नेवासे नगरपंचायत अशा चार निवडणुका लांबणीवर गेल्या..Local Body Election: वाढीव मतांचा टक्का कुणाच्या पथ्यावर?.ईव्हीएम सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. परिसरात कोणताही अनधिकृत प्रवेश होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. या आठ नगरपालिकांच्या निवडणुकीत ३ लाख २२ हजार ०२० मतदार होते..नगरपालिकेतील मतदानाची टक्केवारीश्रीरामपूर ६६.६२संगमनेर ७२.७५राहुरी ७२.४६राहाता ७७.८७श्रीगोंदा ७९.८४शेवगाव ६९.०४जामखेड ७५.६३शिर्डी ७५.१६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.