Ahilyanagar News : राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ते आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक केल्याचा आदेश ११ सप्टेंबर रोजी काढण्यात आला आहे. या संदर्भात गृहमंत्रालयाचे सहसचिव राजेश होळकर यांनी ही अधिसूचना जारी केली आहे..केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने याबाबत ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिल्यानंतर राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (ता. जामखेड) आहे. .Beed Railway : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी अहिल्यानगर-बीड रेल्वे धावणार.अहिल्यादेवी यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ३१ मे २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडी येथील कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची जाहीर घोषणा केली होती. .Beed-Parali Railway: बीड-परळी रेल्वेमार्ग भूसंपादन प्रक्रिया वेळेत पूर्ण करा; जॉन्सन.त्यानंतर अहमदनगर महापालिकेकडे नामांतराचा ठराव करण्याची सूचना पाठवली होती. प्रशासक राजवट सुरू झाल्यानंतर प्रशासकीय महासभेत नामांतराचा ठराव करण्यात आला. त्यानंतर महसूल व वन विभागाने अहमदनगर शहर, उपविभाग व जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर केल्याची अधिसूचना ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केली होती..राज्य सरकारने नाव बदलले असले तरी केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांची नावे मात्र त्यानंतरही अहमदनगरच राहिलेले आहे. आता केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी अहमदनगर रेल्वेस्थानकाचे नामांतर अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्यानंतर राज्य सरकारच्या गृह मंत्रालयानेही अधिसूचना जारी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.