Goat Theft Investigation: वेगवेगळ्या भागांतून शेळ्या चोरून त्या मटण विक्रेत्यांना विकणारी टोळी अहिल्यानगर पोलिसांनी पकडली आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली. अहिल्यानगर, श्रीगोंदा, संगमनेर तालुक्यांसह रांजणगाव एमआयडीसी परिसरातील शेळ्या व बोकड चोरीचे जवळपास १२ गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पकडलेल्या शेळ्या संगमनेर तालुक्यातील पळसखेडे येथून चोरल्याचे आढळून आले..ग्रामीण भागात शेतकरी शेळीपालनाला प्राधान्य देत आहेत. मात्र अहिल्यानगर, पुण्यासह अन्य काही जिल्ह्यांत शेळ्या व बोकड चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. या बाबत शेतकऱ्यांनी तक्रारीही केल्या होत्या. रस्त्यालगत अथवा एकांत ठिकाणी असलेल्या शेळ्या-बोकडांवर पाळत ठेवून चोरी केली जात होती..Goat Theft: घरासमोरून २३ शेळ्या, दोन बोकडांची चोरी .शेळ्या चोरी करणारे आरोपी कारमधून अहिल्यानगर परिसरातील केडगाव बायपास येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कार अडवली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तीन शेळ्या आणि एक बोकड आढळून आला. .Goat Theft Gang: शेळ्या चोरणारी टोळी अखेर जेरबंद, १८ गुन्ह्यांची उकल.पोलिसांनी ओमकार सुधाकर परंवार (वय २७, रा. खडकी, पुणे), अरबाज रशीद कुरेशी (वय २६), शहाबाज सिराज कुरेशी (वय २६, चंद्रमानगर, येरवडा, पुणे) आणि सक्षम विवेक भोर (वय १९, गांधीनगर, पिंपरी, पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ९ लाख रुपयांची कार, तीन शेळ्या, एक बोकड आणि दोन मोबाइल असा एकूण ९ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला..या प्रकरणी लोणी काळभोर येथील ताब्यात घेतलेल्या एका मटण विक्रेत्याने चोरीच्या शेळ्यांची कत्तल करून विक्री केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून विक्रीची ५० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून, इतर चार मटण विक्रेते अद्याप पसार असून त्यांचा शोध सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.