Ahilyanagar News: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी १७ प्रभागांमध्ये ३४५ मतदान केंद्रांवर सुविधा असणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रियेनंतर सर्व ईव्हीएम मशिन ‘एमआयडीसी’तील वखार महामंडळाच्या ६ नंबरच्या गोडाऊनमध्ये केलेल्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत. १६ जानेवारीला सकाळी १० वाजता ७ नंबर गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार आहे. त्याची तयारीही प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे..मतदान प्रक्रियेसाठी एक हजार ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच, प्रत्यक्ष मतमोजणीसाठी ६८ मतमोजणी पर्यवेक्षक व ६८ मतमोजणी सहायक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. १६ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल..Local Body Election: स्वीकृत नगरसेवक पदावर अभ्यासू, अनुभवी व्यक्तींना संधी.सकाळी साडेनऊ वाजता स्ट्राँग रूम उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या, तसेच मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने व निवडणूक निरीक्षक श्रीमंत हारकर यांच्या समक्ष उघडण्यात येणार आहे. सर्वप्रथम सकाळी १० वाजता टपाली मतपत्रिका मोजणीस सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. सर्व १७ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे..Local Body Elections: भूम तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींवर प्रशासक बसणार?.प्रत्येक प्रभागासाठी पोस्टल मतदानासाठी एका टेबलावर व ईव्हीएम मशिनसाठी तीन टेबलांवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. १७ प्रभागासाठी पोस्टल मतदानासाठी १७ टेबल व ईव्हीएम मशिनसाठी प्रत्येक प्रभागासाठी तीन असे ५१ टेबल आहेत. एकूण ६८ टेबलावर मतमोजणी होणार आहे..प्रतिनिधींना ओळखपत्र बंधनकारकउमेदवार किंवा त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी ओळखपत्र देतील. त्यांनी तशी मागणी नोंदवावी. ओळखपत्राशिवाय मतमोजणी केंद्रावर व आवारात प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी केंद्रात मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड नेता येणार नाहीत. माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी अद्ययावत पत्रकार कक्ष स्थापन करण्यात आला आहे. प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.